नवी दिल्लीः राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानानंतर सर्वच स्तरांतून त्यांच्यावर टीका होत आहे. राहुल गांधींच्या वादग्रस्त विधानामुळे सावरकर प्रेमी प्रचंड संतप्त झाले असून, त्यांनी राहुल गांधींवर हल्लाबोल करण्यात सुरुवात केली आहे. प्रसिद्ध रंगकर्मी आणि सावरकरांचे प्रेमी असलेल्या योगेश सोमण यांनी राहुल गांधींना खडे बोल सुनावले आहेत. एक व्हिडीओ सोशल मीडियावर टाकून सोमण यांनी मनातली खदखद व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे सोमण यांनी राहुल गांधींची 'खान' अशी हेटळणी केली आहे. तू सावरकर नाही, त्यांच्यातले तुझ्यात काहीही गुण नाहीत, पण मला तर वाटतं तू गांधीसुद्धा नाहीस, कारण गांधीजींमधलेही गुण तुझ्यात नाहीत. लग्नानंतर भारतीयांना स्वीकारार्ह व्हावं म्हणून तुझ्या इंदिरा आज्जी आणि फिरोज आबांना गांधीजींनी हे आडनाव दिलं. सध्याची तुझी अवस्था ही आधी मर्कट त्यातही मद्य प्राशन केलेला, अशी झाली आहे. तरीसुद्धा तुझ्या पप्पूगिरीचा मी निषेध करतो. सावरकरांचं आडनाव घेण्याचीही तुझी औकात नसल्याचंही ते म्हणाले आहेत.
सावरकर वादावरून सोमणांची राहुल गांधींवर घणाघाती टीका, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2019 19:05 IST