शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

International Yoga Day 2018 : योगा नृत्याची, नवीन संकल्पना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2018 02:10 IST

योगासन करणे हे आपल्या शारीरिक आरोग्यासाठी उत्तम व्यायाम आहे असे म्हणतात. पण योगा करताना त्यामध्ये नृत्य करण्याची नवीन संकल्पना फिटनेस फ्री या ग्रुपने अस्तित्वात आणली आहे.

- अतुल चिंचलीपुणे : योगासन करणे हे आपल्या शारीरिक आरोग्यासाठी उत्तम व्यायाम आहे असे म्हणतात. पण योगा करताना त्यामध्ये नृत्य करण्याची नवीन संकल्पना फिटनेस फ्री या ग्रुपने अस्तित्वात आणली आहे. आजकालच्या आधुनिक युगात सर्व माणसे काम आणि पैसा कमवण्यात फारच व्यस्त आहेत. ते पैसे कमवण्यासाठी आता स्वत:च्या शरीराकडे आणि आरोग्याकडे लक्ष देत नाहीत. वयाच्या चाळिशी अथवा पन्नाशीनंतर सतत आजारांना सामोरे जावे लागते. या वयात अनेक लोक रिटायर होतात. मग त्यांना घरी बसून एकटेपणा जाणवू लागतो. या एकटेपणामुळे तणाव निर्माण होणे, शरीर निरोगी राहणे अशा गोष्टी घडण्यास सुरुवात होते. या गोष्टींना दूर करण्यासाठी फिटनेस फ्री या स्त्रियांच्या ग्रुपने योगा नृत्य ही नवीन संकल्पना अस्तित्वात आणली आहे.फिटनेस फ्री ग्रुपच्या अध्यक्षा वैशाली नाफडे असून, त्यांना मदत म्हणून शिकवण्याची सर्व जबाबदारी राधिका फडके घेतात. या ग्रुपमध्ये वीस स्त्री सदस्य असून, सर्व वयाने चाळीसपेक्षा पुढे आहेत. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आंतरराष्ट्रीय योगा दिवस साजरा करण्यास सुरुवात केल्यानंतर फिटनेस फ्री या ग्रुपने हे पाऊल उचलले. जवळपास एक वर्षापासून हा ग्रुप निरनिराळ्या प्रकारचे योगा नृत्य करून दाखवत आहे. आपण योगासन करताना जे प्रकार उष्टसन, सूर्यनमस्कार, प्रार्थनासन, वीरासन, योगमुद्रासन, गोरक्षासन, स्वस्तिकासन, वज्रासन यातून योगा नृत्य दाखवले जाते. तसेच या नृत्यप्रकारात वेस्टर्न गाणी लावून त्यावर कथक अथवा गरबा नृत्य हा ग्रुप करतो. योगा नृत्यात एक नवीन प्रकार या ग्रुपने आणला आहे.>योगा नृत्यामुळे होणारे फायदेयोगा नृत्याच्या संगीतामुळे मन आनंदी होऊन ते करण्याची उत्सुकता वाढते.शरीर निरोगी राहते व एकटेपणा नाहीसा होतो.सध्याच्या युगात होणारे मधुमेह, रक्तदाब या आजारांचा त्रास होत नाही.मन प्रसन्न राहिल्याने तणाव निर्माण होत नाही व शरीर तंदुरुस्त राहते.फिटनेस फ्री हा ग्रुप आता या योगा नृत्यमध्ये लहान मुले आणि तरुण मुलांना शिकवण्याची जबाबदारी घेणार आहे. लहान मुले आणि तरुण योगासन करण्यास पुढाकार घेत नाहीत. त्यांना मोबाईलवाचून वेळ मिळत नाही व मैदानी खेळांचे प्रमाण खूपच कमी झाले आहे. त्यामुळे कुठलाही आजार हा वयाच्या अठरा, वीस वर्षांपासून सुरू होते. हे वय आजाराचे नसून त्या वयात आजारांना सामोरे जावे लागणे हे त्यांच्यासाठी आणि भविष्यासाठी खूपच घातक आहे. त्यासाठी हा ग्रुप या योगा नृत्याची संकल्पना समाजासमोर मांडून लहान मुले तसेच तरुण वर्ग यात जास्तीत जास्त सहभागी होईल, असे प्रयत्न करणार आहे.>पार्टनर योगा नृत्यया नृत्यप्रकारात सी सो म्हणजेच उठाबशा काढणे हा व्यायाम केला जातो. पण या चाळिशी, पन्नाशीनंतर हे करणे अवघड होते. अशा वेळी या स्त्रिया एकमेकींच्या साहाय्याने हा नृत्यप्रकार करतात आणि तो करताना कुठलाही त्रास होत नाही.>आपल्या जीवनात एक पोकळी निर्माण होणे गरजेचे आहे. काम करण्याबरोबर व्यायाम, योगासने करणे ही काळाची गरज निर्माण झाली आहे. ती लक्षात घेतली तर सर्वांना निरोगी राहता येईल. आमचा फिटनेस फ्री ग्रुप यासाठी कार्यरत आहे. परंतु सर्वांनी त्यात सहभागी व्हावे आणि आजच्या योगा डे पासून व्यायाम करण्याची शपथ घ्यावी.- वैशाली नाफडे,अध्यक्षा, फिटनेस फ्री ग्रुप.

टॅग्स :Yogaयोग