कोल्हापूर : केसापूर पेठ (जुना बुधवार पेठ) येथील दीडशे वर्षांची परंपरा लाभलेल्या शिपुगडे तालीम मंडळाने गेल्या १५८ वर्षांत एकदाही डॉल्बी साऊंड सिस्टीमला थारा दिला नाही. वर्गणीतून जमा होणाऱ्या निधीचा सुयोग्य वापर करीत गरजूंना मदत करण्याचा पायंडा पाडला आहे. हा त्यांचा उपक्रम इतर मंडळांना आदर्शवत ठरणार आहे. दीडशे वर्षांपूर्वी जुन्या केसापूर अर्थात जुना बुधवार पेठेत शिपुगडे यांची मोठी जागा होती. त्यातील एका खोलीत शिळोप्याचा गप्पा मारण्यासाठी दिवे लागणीच्यावेळी लोक एकत्र येत. करमणुकीचे साधन काहीच नसल्याने तेव्हा तरुण मुले लेझीम, दांडपट्टा, फरिदगदा असे खेळ खेळत. शिपुगडे यांनी तरुण मंडळाचे साहित्य ठेवण्यासाठी १८५७ मध्ये एक खोली दिली. इमारत जीर्ण झाल्याने तुकाराम डांगे, कृष्णराव भणगे यांनी तिचा कायापालट केला. कालांतराने माजी महापौर शामराव शिंदे यांच्या पुढाकाराने ही तालीम अग्रेसर राहिली. येथून केशव डांगे, दत्तात्रय सूर्यवंशी, मारुती डांगे, बाबूराव पाटील, मिशीवाले ज्ञानदेव डांगे, दत्तोबा चित्रुक यांनी मर्दानी खेळांत नाव केले. कै. आनंदराव डांगे यांनी तर कुस्तीतील वस्ताद महंमद हनिफ यांच्याबरोबर लढत दिली.डॉल्बीला फाटा देत हे उपक्रम राबविलेव्यसनमुक्ती शिबिरकलात्मक मूर्ती पेण (रायगड) येथून आणली जात आहे.गेली तीस वर्षे लोकवर्गणी मागितलेली नाही, तर कार्यकर्ते स्वत:हून वर्गणी व तालमीच्या उत्पन्नातून उत्सव करतात.५ फुटांपेक्षा अधिक उंचीची गणेशमूर्ती बसविली जात नाही.गणेशोत्सवात मागील वर्षी २५ हजार जणांकडून नेत्रदान संकल्प फॉर्म भरून घेतले.वृद्धाश्रमातील वृद्धांची नखे महिन्यातून एकदा काढण्याचा अनोखा उपक्रम.दिवाळीत वृद्धाश्रमात आजी-आजोबांसमावेत उपक्रम.जलसाक्षरता अभियानात पाणी वाचविण्यासाठी प्रबोधनात्मक ध्वनी चित्रफीत काढून एक हजारसीडीजचे वितरणपंचगंगा नदी प्रदूषणामुळे तीन वर्षांपासून गणेशमूर्ती दान.रस्त्यावरील अनाथ व गरजू लोकांना दिवाळीमध्ये तेल-साबण, फराळ देण्याचा उपक्रम राबविला जातो. ‘एक मूठ धान्याची... गोरगरिबांसाठी’ हा उपक्रम यंदा राबविला जात आहे. तालमीला दिग्गजांचा सहवासस्वातंत्र्यपूर्व काळात श्रीपतराव जाधव यांनी तालमीत क्रांतिवीर नाना पाटील, नागनाथ नायकवडी, जी. डी. लाड, दत्तोबा तांबट, रत्नाप्पाआण्णा कुंभार, यासह अन्य भूमिगतांना स्थान दिले. स्वातंत्र्यसैनिक रूद्राप्पा महाजन, बळवंतराव खारेपाटणे, भाऊसाो तावडे, विश्वास जाधव, मारुतराव बचाटे, विष्णुपंत बंगडे, बाबूराव मुळीक, शामराव माने, अभिमन्यू कदम या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना मदत केली. ज्येष्ठ गांधीवादी नेत्या उषा मेहता यांच्या हस्ते ‘अग्निदिव्य’ या स्वातंत्र्यसैनिकांच्या यशोगाथेचे प्रकाशनही येथे झाले. अमोल डांगे सध्या तालमीचे अध्यक्ष आहेत. यंदा मंडळाने ‘इथे ओशाळली माणुसकी’ हा २० फूट बाय २५ रंगमंचांवर तांत्रिक देखावा उभारला आहे.
‘होय, आम्ही डॉल्बी लावत नाही’
By admin | Updated: August 30, 2016 00:56 IST