शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
2
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
3
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
4
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
5
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
6
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
7
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
8
१० वर्षांपासून गर्लफ्रेंडला फसवत होता बॉयफ्रेंड; पाळीव कुत्र्याने 'अशी' केली पोलखोल!
9
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
10
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
11
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
12
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
13
पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?
14
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
15
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
16
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम
17
एक अंध तर दुसरा अपंग, तरीही मिळून तिसऱ्याला संपवलं! घटना ऐकून पोलीसही झाले स्तब्ध
18
घरात लग्नाची तयारी, होणाऱ्या पतीसोबत करायचं होतं फोटोशूट पण तरुणीसोबत घडलं आक्रित अन्...
19
बाजाराचा २ महिन्यांचा उच्चांक! गुंतवणूकदारांची १.२३ लाख कोटींची कमाई, 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर
20
पुढील माहिती मिळेपर्यंत नेपाळला जाऊ नका; सरकारने भारतीयांसाठी सूचना दिल्या

यवतमाळच्या युवकाला चक्क घातक शस्त्रे बाळगण्याचा छंद !

By admin | Updated: August 12, 2016 20:54 IST

प्रत्येकाला कशाचा ना कशाचा छंद असतो. आपल्या आवडीच्या वस्तू गोळा करण्यासाठी अनेक जण आपले आयुष्य खर्ची घालतात.

सुरेंद्र राऊत/ऑनलाइन लोकमत

यवतमाळ, दि. 12 - प्रत्येकाला कशाचा ना कशाचा छंद असतो. आपल्या आवडीच्या वस्तू गोळा करण्यासाठी अनेक जण आपले आयुष्य खर्ची घालतात. छंद जोपासणे हा वैयक्तिक विषय होय. मात्र अमृतसरवरुन पोस्टाने आलेल्या एका पार्सलने यवतमाळातील एका तरुणाचा घातक शस्त्रे गोळा करण्याच्या छंदाचा भंडाफोड झाला. त्याच्या घरझडतीत मोठा शस्त्रसाठाही आढळून आला. अमृतसर येथून पोस्टाच्या कुरिअरने तलवारी यवतमाळात चार तलवारी बोलविण्यात आल्याचे ह्यलोकमतह्ण वृत्त ह्यलोकमतह्ण आॅनलाईनवर झळकताच, त्याची दखल घेऊन टोळी विरोधी पथकाने घेत येथील आनंदनगरातील अमोल रामानंद पांडे (३०) याच्या घराची झडती घेतली. यवतमाळाच्या मध्यवर्ती डाक कार्यालयात अमृतसरवरून एक पार्सल आले. हाताळणीत या पार्सलचे पॅकींग फाटल्याने त्यात तलवारी असल्याचे आढळून आले. सदर बाब मागील आठ दिवसांपूर्वीच डाक विभागातील कर्मचाऱ्यांनी वरिष्ठांच्या निदर्शनास आणून दिली. यावर वरिष्ठांनी कोणतीच कारवाई केली नाही. अखेर ह्यलोकमतह्णमध्ये या संदर्भात वृत्त प्रसिद्ध झाले. पोस्टाकडून कोणती ही कारवाई होण्यापूर्वीच टोळी विरोधी पथकाने शुक्रवारी सकाळी सदर युवकाचे घर गाठून झडती घेतली. यामध्ये त्या युवकाच्या घरात एक धारदार तलवार, फरशी कुऱ्हाड आणि तीन गुप्ती असा घातक शस्त्र साठा आढळून आला. अमोल पांडे या युवकाची गुन्हेगारी पार्श्वभुमी आहे काय, याचाही शोध टोळी विरोधी पथक घेत आहे. अमोल विरोधात शस्त्रात्र प्रतिबंधक कायदानुसार गुन्हा दाखल केला.शहरात मागील काही दिवसापासून सातत्याने खुनाचे सत्र सुरू आहे. गुन्हेगारी टोळक्यामध्ये आपसातील वादातून बहुतांश खुन झाल्याचे पुढे आले आहे. यामध्ये वापरण्यात येणारी धारदार शस्त्र आणि अमोल पांडे याचे काही कनेक्शन लागते काय, याचाही पोलीस तपास करणार आहे. मोठ्या प्रमाणात शस्त्र साठा बोलावून येत्या काही दिवसात मोठा घातपात घडविण्याचा कट तर नाही ना, यावरही पोलिसांनी लक्ष केंद्रीत केले आहे. अमोल पांडे याने पॉलिटेक्निकचा डिल्पोमा केला आहे. सध्या तो आर्णी मार्गावर असलेल्या एका वाईन शॉप मध्ये नोकरी करत असल्याचे प्रथमदर्शनी पुढे आले आहे. त्याने अृमतसर येथील हॅन्डीक्राफ कंपनीकडून या चार तलवारींची आॅर्डर केल्या. त्याच कंपनीने अमोलच्या पत्यावर हा शस्त्रसाठा कुरिअरच्या माध्यमातून पाठविण्याची व्यवस्था केली. पोलिसांचा कोणताही ससेमिरा पाठीमागे न लागता थेट घरपोच शस्त्र मिळविण्याची सोयच पोस्टाच्या गलथान कारभारामुळे उपलब्ध झाली आहे. इतका गंभीर प्रकार असून ही डाक विभागातील अधिकाऱ्यांनी पोलिसांना कोणीतच माहिती अथवा तक्रार अर्ज दिला नाही. यावरून डाक विभागाची उदासिनात दिसून येते.