शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळात पंजाब नॅशनल बॅकेच्या एटीएमची तोडफोड

By admin | Updated: November 15, 2016 21:36 IST

पाचशे व हजाराच्या नोटा बदलविण्यासाठी, पैसे काढण्यासाठी ग्राहकांच्या बँका व एटीएमसमोरील रांगा कायम आहेत. त्यातूनच एका संतप्त ग्राहकाने मंगळवारी येथील पंजाब नॅशनल

ऑनलाइन लोकमत/रूपेश उत्तरवार
यवतमाळ, दि.15 - पाचशे व हजाराच्या नोटा बदलविण्यासाठी, पैसे काढण्यासाठी ग्राहकांच्या बँका व एटीएमसमोरील रांगा कायम आहेत. त्यातूनच एका संतप्त ग्राहकाने मंगळवारी येथील पंजाब नॅशनल बँकेच्या एटीएममध्ये तोडफोड केली. या प्रकरणी यवतमाळ ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली आहे. 
यवतमाळातील दारव्हा मार्गावर एका हॉटेलनजीक पंजाब नॅशनल बँकेची नवी शाखा सुरू झाली. त्याच्या बाजूलाच एटीएम उभारण्यात आले आहे. या एटीएमसमोर ८ नोव्हेंबरच्या रात्रीपासून दररोज ४०० ते ५०० ग्राहकांची गर्दी असते. मंगळवारी दुपारीसुद्धा मोठी रांग होती. या रांगेतीलच एका युवकाने आपला नंबर केव्हा लागणार असे म्हणत एटीएमच्या दाराला जोरदार लाथ मारुन काचांची तोडफोड केली. त्याच क्षणी तेथील सायरन वाजल्याने हा ग्राहक पळून गेला. पंजाब नॅशनल बँकेचे शाखा व्यवस्थापक राम खांब यांनी समोरच असलेल्या यवतमाळ ग्रामीण पोलीस ठाण्याला या तोडफोडीची सूचना दिली. मात्र एटीएमची तोडफोड झालेले घटनास्थळ आपल्या हद्दीत येत नसल्याचे सांगून त्यांनी कारवाईस असमर्थता दर्शविली. सायंकाळी ६.३० पर्यंतसुद्धा पोलीस तेथे पोहोचले नव्हते. शिवाय तोडफोडीमुळे संपूर्ण एटीएममध्ये काचा विखुरलेल्या होत्या. 
व्यवस्थापक राम खांब यांनी ‘लोकमत’ला सांगितले की,  या तोडफोडीमुळे २० हजारांचे नुकसान झाले आहे. एटीएममधील तोडफोडीनंतर आपण लोकांना पैसे काढणे थांबविण्याची विनंती केली. मात्र लोक ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. घटनेवरून चार तास लोटूनही पोलीस न आल्याने एटीएममधील रोकड असुरक्षित झाल्याचे त्यांनी सांगितले. किमान गर्दी ओसरेपर्यंत दोन पोलिसांची सुरक्षा पुरवावी, अशी आपली मागणी आहे. ही सुरक्षा न पुरविली गेल्यास एटीएम चालविणे कठीण जाईल, त्यात रक्कम कशी टाकावी हा प्रश्न निर्माण होणार असल्याचे त्यांनी सांगितले. 
पाचशे व हजाराच्या नोटा बंदीमुळे नागरिकांना दैनंदिन व्यवहार करणेही कठीण झाले आहे. तासन्तास बँका व एटीएमसमोर रांगा लावूनही पैसे मिळत नसल्याने नागरिक वैतागले आहे. त्यातूनच पंजाब नॅशनल बँकेच्या एटीएमची तोडफोड झाली. या घटनेची पुनरावृत्ती जिल्ह्यातील अन्य एटीएम व बँकांमध्ये होण्याची भीती बँकींग क्षेत्रातील यंत्रणेकडून व्यक्त केली जात आहे.  मंगळवारी अनेक बँकांची लिंक फेल असल्याने नागरिकांना सकाळी ११ पासून सायंकाळी ५ पर्यंत रांगेत राहूनही हाती पैसे मिळाले नाही. त्यामुळे नागरिकांत प्रचंड रोष पहायला मिळत होता.