शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

काश्मिरातील अतिरेकी हल्ल्यात यवतमाळचा जवान शहीद

By admin | Updated: September 19, 2016 19:53 IST

जम्मू काश्मिरातील उरी येथे भारतीय लष्कराच्या तळावर शनिवारी पहाटे अतिरेक्यांनी केलेल्या सशस्त्र हल्ल्यात यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यांतर्गत येणाऱ्या पुरड गावचा जवान शहीद झाला

ऑनलाइन लोकमतयवतमाळ, दि. १९ : जम्मू काश्मिरातील उरी येथे भारतीय लष्कराच्या तळावर शनिवारी पहाटे अतिरेक्यांनी केलेल्या सशस्त्र हल्ल्यात यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यांतर्गत येणाऱ्या पुरड गावचा जवान शहीद झाला. विकास जनार्दन कुडमेथे असे या वीरपुत्राचे नाव आहे. दरम्यान मंगळवारी त्यांच्या पार्थिवावर पुरड येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहे. वणी तालुक्यातील पुरड या गावातील विकास कुडमेथे हे २००८ मध्ये लष्करात भरती झाले होते. देशसेवेच्या भावनेने त्यांनी लहानवयापासूनच सैन्यात जाण्याचे ध्येय बाळगले होते. घरच्या गरिबीवर मात करीत त्यांनी शरीर कमावले. ग्रामीण भागातील हा तरुण डोग्रा बटालियनमध्ये ह्यसिलेक्टह्ण झाला होता.

दरम्यान, शनिवारी विकास कुडमेथे ज्या उरी येथील तळावर तैनात होते, तेथे अतिरेक्यांनी सशस्त्र हल्ला चढविला. पहाटेच्या सुमारास अचानक हल्ला झाल्याने सुरुवातीला भारतीय सैन्य बेसावध होते. मात्र, क्षणातच त्यांनी आघाडी सांभाळली आणि जवळपास तीन तास अतिरेक्यांना दमदार प्रत्युत्तर दिले. या धुमश्चक्रीत चारही अतिरेक्यांना कंठस्नान घालण्यात भारतीय सैन्याला यश आले. मात्र, १८ भारतीय जवानही शहीद झाले. त्यात यवतमाळ जिल्ह्यातील पुरड येथील विकास कुडमेथे यांचाही समावेश होता.

ही वार्ता सोमवारी सकाळी पुरड गावात धडकताच शोकाकूल वातावरण निर्माण झाले. विकास यांची पत्नी स्नेहा, आई विमल, वडील जनार्दन या कुटुंबीयांवर तर दु:खाचा डोंगरच कोसळला. त्यांचा आक्रोश अख्ख्या गावाचे मन हेलावून टाकत होता. विकास यांची अवघी दहा महिन्यांची मुलगी जिज्ञासा ही सध्या आजारी आहे. रडणाऱ्या आईच्या कडेवर बसलेल्या जिज्ञासाचा केविलवाणा चेहरा साऱ्यांचे काळीज कुरतडत होता. दरम्यान, विकास यांचे पार्थिव सोमवारी रात्रीपर्यंत नागपुरात येणार असून मंगळवारी पुरड येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे कुटुंबियांनी सांगितले. आपल्या गावातील वीरपुत्राचा अभिमान बाळगणारे पुरड येथील शोकाकूल गावकरी संपूर्ण दिवसभर कुडमेथे यांच्या घरापुढे बसून होते.