शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

यवतमाळमध्ये काँग्रेसचा जनआक्रोश महामोर्चा, भाजपा सरकारचा निषेध, पारंपरिक वाद्यांची साथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2017 04:20 IST

कर्जमाफी, फवारणीमुळे शेतक-यांचे होणारे मृत्यू, महागाई, जीएसटीची अंमलबजावणी अशा मुद्द्यांवर जिल्हा काँग्रेस समितीच्या वतीने यवतमाळात सोमवारी जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला.

यवतमाळ : कर्जमाफी, फवारणीमुळे शेतक-यांचे होणारे मृत्यू, महागाई, जीएसटीची अंमलबजावणी अशा मुद्द्यांवर जिल्हा काँग्रेस समितीच्या वतीने यवतमाळात सोमवारी जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला.पारंपरिक डफ, सनई यांच्या ताला-सुरांनी सरकारविरोधात काढलेला हा मोर्चा लक्षवेधी ठरला. या मोर्चात दहा-पंधरा बैलगाड्याही होत्या. एका बैलगाडीत बसलेले काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण, माणिकराव ठाकरे, वजाहत मिर्झा घोषणा देत होते. मोर्चाच्या पुढे चालत शिवाजीराव मोघे कार्यकर्त्यांना सूचना करीत होते. भजनी मंडळाने ग्रामीण माणसाच्या मनातील व्यथा भजनांतून व्यक्त केली. भाजपा सरकारने अर्धवट ठेवलेले किंवा आश्वासन देऊनही पूर्ण न केलेले मुद्दे मोर्चेक-यांच्या हातातील फलक बनले होते.कर्जमाफी भिकेसारखी देऊ नकापंतप्रधान नरेंद्र मोदींच्या काशी बनारस मतदारसंघातील दवाखान्यात लोक मरत आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी यांच्या गोरखपूरमध्ये तर दोनशे मुले दगावली. विदर्भात वाघाच्या हल्ल्यात लोक मरत आहेत. पण सरकार याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाही. हे शासन नरभक्षक आहे. शेतक-यांची कर्जमाफी ही भीक नव्हे. मात्र शासन भीक दिल्यासारखीच कर्जमाफीची प्रक्रिया राबवित आहे. पूर्वी मोदी किटली घेऊन चहा विकायचे. पण आता ते जेटली घेऊन देश विकायला बसले आहेत, असा घणाघात मोहन प्रकाश यांनी जाहीर सभेत केला.चाय-गाय करणा-यांना बाय-बाय करा - अशोक चव्हाणकर्जमाफीच्या अर्जातही भाजपा सरकार शेतकºयांची जात लिहून घेत आहे. मागासवर्गीय, मुस्लिमांवर हल्ले वाढले आहेत. मराठा, धनगर आरक्षण बाजूला टाकण्यात आले आहे. मुख्यमंत्री फडणवीस नसून ते फसणवीस आहेत. पण आता वारं बदललं आहे.म्हणूनच नांदेडमध्ये भाजपाचा सुपडासाफ झाला. मोदी चाय चाय म्हणतात. योगी गाय गाय करतात. आता जनतेने यांना बाय बाय म्हणण्याची वेळ आली आहे, असे खा. अशोक चव्हाण म्हणाले.

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाणIndian National Congressइंडियन नॅशनल काँग्रेस