शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मुंबई गुजरातचाच भाग होता, मराठी लोक केवळ ३२ टक्केच; भाजपा खासदार निशिकांत दुबे पुन्हा बरळले
2
'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,...
3
सावध ! विंचू पिंडीवर बसलाय ! पडळकर हा विषय अत्यंत गंभीर अन् आव्हाडांची गँग...
4
आजचे राशीभविष्य, १९ जुलै २०२५: यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील
5
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
6
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
7
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे
8
मंत्र्यांच्या आईच्या नावावर डान्सबार; अनिल परब यांचा आरोप
9
कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करूच, शेतकऱ्यांसाठी कधी हात आखडता घेतला नाही : मुख्यमंत्री
10
मी तसे बोलायला नको होते; सभागृहात आणि बाहेर केलेल्या विधानांवरून आमदारांचा माफीनामा
11
‘विधिमंडळ प्रवेश पास ५ ते १० हजारांत विकले जातात’; आमदारांच्या आरोपाने खळबळ
12
दुबे यांनी मुंबईत येऊन दाखवावे, समुद्रात बुडवून बुडवून मारू; राज ठाकरेंचे भाजप खासदाराला प्रत्यूत्तर 
13
गांजा घरातच ‘पिकविण्या’चा नवा उद्योग; चार वर्षांपूर्वी पोलिसांना कल्पनाही नव्हती...
14
पडळकरांकडून दिलगिरी व्यक्त; जे घडले ते वाईटच : आव्हाड
15
शेतकऱ्यांसाठी अलर्ट : टॅरिफमुळे अमेरिकेची कृषी उत्पादने भारतात आल्यास गंभीर परिणाम 
16
ऑटो ट्रान्सलेशनमुळे गोंधळ!; ‘मेटा’च्या अनुवाद तंत्राने मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनाच ठरवले ‘मृत’
17
माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाला मद्य घोटाळ्यात ईडीची अटक; छत्तीसगडमध्ये चैतन्य बघेल यांना कोठडी
18
महाराष्ट्र, केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टाचे खडे बोल ; विशेष न्यायालय स्थापना प्रस्तावासाठी शेवटची संधी
19
ड्युक्स कंपनीने तपासणीसाठी कसोटी चेंडू परत मागितले; भारत-इंग्लंड कसोटी मालिकेत चर्चेचा विषय
20
बीसीसीआय मालमाल झाली! ₹ ९,६४१ कोटींची केली रेकॉर्ड ब्रेकिंग कमाई

रायगड किल्ल्यावर उत्खननात आढळले 'यंत्रराज' सौम्ययंत्र खगोलशास्त्रीय उपकरण

By संदीप आडनाईक | Updated: June 1, 2025 23:42 IST

खगोलशास्त्रीय अभ्यास करून रायगड बांधल्याचा दावा, पुरावा उघड

संदीप आडनाईक

कोल्हापूर : दुर्गराज रायगडाचे बांधकाम करताना खगोलशास्त्रीय अभ्यास करून तत्कालीन अत्याधुनिक आणि शास्त्रोक्त पद्धतीचा वापर झाल्याचा महत्वाचा पुरावा उघड झाला. रायगड विकास प्राधिकरणचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती यांनी रविवारी सोशल मिडियावरुन ही माहिती जाहीर केली.दुर्गराज रायगड येथे भारतीय पुरातत्त्व विभाग व रायगड विकास प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या उत्खनन प्रक्रियेमध्ये गडावर प्राचीन हे 'यंत्रराज सौम्ययंत्र' (Astrolabe) हे खगोलशास्त्रीय उपकरण सापडले आहे.

भारतीय पुरातत्व विभाग आणि रायगड विकास प्राधिकरणाकडून गेल्या तीन ते चार वर्षापासून रायगडाच्या रोपवे अप्पर स्टेशनची मागील बाजू, कुशावर्त तलाव, बाजारपेठ, जगदीश्वर मंदिर या भागांमधे जे शिवकालीन वाड्यांचे अवशेष आहेत, अशा जवळपास १० ते १२ विविध ठिकाणी हे उत्खनन सुरु होते. कुशावर्त तलावाच्या वरील भागात तसेच पर्जन्यमापक आणि वाडेश्वर मंदिराच्या मध्यभागात असलेल्या ऐतिहसिक वाड्याच्या जागेवर उत्खनन करताना हे यंत्रराज, सौम्ययंत्र खगोलशास्त्रीय उपकरण सापडले.

दुर्गराज रायगडाचे बांधकाम करताना खगोलशास्त्रीय अभ्यास करण्यासाठी या यंत्राचा वापर झाला असण्याची शक्यता आहे. या अमूल्य ठेवल्यामुळे इतिहास अभ्यासकांना पुढील संशोधनासाठी खूप मोठी संधी उपलब्ध झाली आहे. -संभाजीराजे छत्रपती, अध्यक्ष, रायगड विकास प्राधिकरण.

कासव, सापासारख्या दोन प्राण्यांचे छाप...

या यंत्रराजवरच्या वरील बाजूस काही अक्षरे कोरलेली आहेत. मध्यभागी एक कासव, सापासारख्या दोन प्राण्यांचे छाप आहेत. त्यांचे मुख आणि शेपटी कुठल्या दिशेला असावी, हे समजण्यासाठी वरील बाजूस मुख आणि पूंछ अशी अक्षरे सुद्धा कोरलेली आहेत. यावरून उत्तर आणि दक्षिण दिशा कुठे असावी, याचा अंदाज बांधला जात होता.

दिशांचा वेध घेण्याचे यंत्र

प्राचीन कालखंडापासून ग्रहताऱ्यांच्या अभ्यासासाठी, दिशांचा वेध घेण्यासाठी तसेच वेळ मोजण्यासाठी अस्ट्रोलॅब म्हणजे प्राचीन यंत्रराज, सौम्ययंत्र हे खगोलशास्त्रीय उपकरण वापरले जात होते. विशेषत: अक्षांश, रेखांश, कर्कवृत्त, विषुववृत्त यांसारख्या गोष्टींचा अभ्यास करणे यामुळे सोपे जात असे.

टॅग्स :Sambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपतीRaigadरायगड