शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

केंद्र सरकारकडून सदाभाऊ खोतांना आता Y दर्जाची सुरक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2022 15:05 IST

Sadabhau Khot : गेल्या काही दिवसांमध्ये सदाभाऊ खोत यांना जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या आहेत. त्यामुळे सदाभाऊ खोत यांना वाय दर्जाची सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे.

मुंबई : माजी मंत्री आणि रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत  (Sadabhau Khot) यांना केंद्रीय गृहखात्याने वाय दर्जाची सुरक्षा पुरवली आहे. केंद्रीय गृहखात्याने यासंदर्भात मुंबई पोलीस आणि संबंधित सुरक्षा दलांना आदेशाचे पत्र पाठवले आहे. त्यानुसार सदाभाऊ खोत यांना रविवारपासून वाय दर्जाची सुरक्षा प्राप्त झाली आहे. 

गेल्या काही दिवसांमध्ये सदाभाऊ खोत यांना जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या आहेत. त्यामुळे सदाभाऊ खोत यांना वाय दर्जाची सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे. आढावा समितीची पुढील बैठक होईपर्यंत सदाभाऊ खोत यांना वाय दर्जाची सुरक्षा लागू असेल, असे या पत्रात म्हटले आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी हॉटेलमध्ये जेवणाची उधारी थकल्यामुळे एका हॉटेल मालकाने सदाभाऊ खोत यांना अडवल्याचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला होता. त्यानंतर सदाभाऊ खोत यांनी तो राष्ट्रवादीचा कार्यकर्त्या असल्याचा आरोप केला आणि आपल्या जीवाला धोका असल्याचा दावा केला होता. 

आतापर्यंत केंद्र सरकारने राज्यातील भाजपच्या अनेक नेत्यांना विशेष सुरक्षा पुरवली आहे. सदाभाऊ खोत यांना पुरवण्यात येणाऱ्या वाय दर्जाच्या सुरक्षा पथकात एकूण ११ सुरक्षारक्षक असतील. यामध्ये एनएसजीचे एक किंवा दोन कमांडो आणि पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश असेल. काही दिवसांपूर्वीच केंद्रीय गृहखात्याने अपक्ष खासदार नवनीत रवी राणा यांनाही वाय प्लस दर्जाची सुरक्षा प्रदान केली होती.

आपल्या जीवाला धोका असल्याचा दावादोन दिवसांपूर्वी सदाभाऊ खोत हे पंचायतराज समितीच्या माध्यमातून सोलापूर दौऱ्यावर होते. त्यावेळी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान 'हॉटेलची उधारी द्या, मगच पुढं जावा' असे म्हणत सांगोला येथील अशोक शिनगारे या हॉटेल मालकाने सदाभाऊ खोत यांना अडवले होते. या प्रकारामुळे सदाभाऊ खोत चांगलेच अस्वस्थ झाले होते. याबाबत सदाभाऊ खोत म्हणाले होते की, "पंचायतराज समितीच्या माध्यमातून सोलापूर दौऱ्यासाठी सांगोल्यामध्ये आलो होतो. त्यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी माझा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. अंगावर येण्याचाही प्रयत्न केला. जाणीवपूर्वक गोंधळ घालण्याचा प्रकार केला. हा प्रकार निषेधार्ह आहेच. या प्रकरणी पोलिसांमध्ये तक्रार केली आहे. पोलिसांनी एका जणाला ताब्यात घेतलं आहे." तसेच सदाभाऊ खोत यांनी आपल्या जीवाला धोका असल्याचा दावा केला होता.

राज्य सरकारकडूनही सुरक्षेत वाढ दरम्यान, राज्य सरकारनेही सदाभाऊ खोत यांच्या सुरक्षेत वाढ केली होती. सदाभाऊ खोत यांच्या जीवाला राष्ट्रवादीकडून धोका आहे, असे मला वाटत नाही. परंतु तरी सुद्धा त्यांनी जी भीती व्यक्त केलेली आहे. ती लक्षात घेता आणि त्यांचं जीवन सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टिकोनातून मी राज्याच्या पोलीस प्रमुखांना सूचना दिलेल्या आहेत, असे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी सांगितले होते.

टॅग्स :Sadabhau Khotसदाभाउ खोत