शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिगोचे संकट वाढले! ८२९ प्रवासी सामुहिक खटला दाखल करणार, एअरलाईन्सवर नामुष्की...
2
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
3
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
4
जॅकपॉट अन् खजिना...! महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात सापडले सोने, लिथिअम आयनचे साठे; खोऱ्याने पैसा ओढणार...
5
तारीख ठरली, वेळ बदलली? 'या' दिवशी सुरु होणार 'बिग बॉस मराठी ६'; पाहा प्रोमो
6
चोरी केल्यानंतर ते शिर्डी गाठायचे, साईबाबांच्या चरणी 'दान' ठेवायचे! काळाचौकी पोलिसांची २४ तासांत कारवाई; दोन तरुण चोर जेरबंद
7
खोकला, घशात खवखव; मुंबईकरांचे आरोग्य बिघडले; वातावरणातील बदलामुळे रुग्ण संख्येत मोठी वाढ
8
गायत्री दातारच्या आयुष्यात हिरोची एन्ट्री! अभिनेत्रीने गुपचूप केला साखरपुडा, फोटो समोर
9
वर्सोवा-भाईंदर कोस्टल प्रकल्पासाठी ४५ हजार खारफुटी तोडणार; हायकोर्टाचा हिरवा झेंडा
10
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
11
पतीकडूनच सर्पदंश करवून पत्नीची हत्या, ब्रेन हॅमरेजने मृत्यू झाल्याचा बनाव; तिघांना अटक
12
मुंबईच्या फनेल झोनमधील इमारतींच्या पुनर्विकासासाठी 'हाउसिंग फॉर ऑल' योजना
13
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
14
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
15
सर्व्हेसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर जमावाकडून दगड आणि धनुष्यबाणांद्वारे हल्ला, ४७ जण जखमी   
16
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
17
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
18
आश्रम हल्ला प्रकरणातील एकमेव आरोपीची तब्बल ३४ वर्षांनंतर सुटका; काय होते नेमके प्रकरण?
19
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
20
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसच्या एका चुकीच्या ट्विटमुळे राहुल गांधी झाले ट्रोल, राजा राममोहन राय यांच्या जन्मतारखेचा घातला घोळ

By वैभव देसाई | Updated: September 29, 2017 23:05 IST

राजा राममोहन राय यांच्या पुण्यतिथीनिमित्त काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून एक ट्विट करण्यात आलं होतं. काँग्रेसच्या या ट्विटमुळे ट्विटरक-यांनी राहुल गांधींना अक्षरशः धारेवर धरलं आहे.

मुंबई - राजा राममोहन राय यांच्या पुण्यतिथीनिमित्त काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून एक ट्विट करण्यात आलं होतं. काँग्रेसच्या या ट्विटमुळे ट्विटरक-यांनी राहुल गांधींना अक्षरशः धारेवर धरलं आहे. ट्विटमध्ये लिहिलं होतं, राजा राममोहन राय जे बंगालच्या सुधारणेचे प्रणेते आणि स्त्रियांच्या अधिकारांसाठी झगडणारे समाज सुधारक होते. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आम्ही त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो. काँग्रेसनं ट्विटर अकाऊंटवरून त्यांचा फोटोही टाकला होता. मात्र त्या फोटोमध्ये एक गंभीर चूक होती. 

फोटोत राजा राममोहन राय यांच्या जन्मदिवसाच्या तारखेच्या ऐवजी पुण्यतिथीची तारीख आणि पुण्यतिथीच्या तारखेला जन्मदिवसाची तारीख टाकण्यात आली होती. काँग्रेसनं दोन्ही तारखा चुकवल्या होत्या. त्यामुळे ट्विटरकर काँग्रेस व पर्यायानं राहुल गांधींवर तुटून पडले. त्यानंतर काँग्रेसला स्वतःच्या चुकीची उपरती झाली. दुसरं एक ट्विट करत काँग्रेसनं या चुकीबद्दल क्षमाही मागितली. राजा राममोहन राय यांच्यासारखाच आमचा डिझायनरही काळाच्या पुढे चालतोय, असं म्हणत एक स्मायलीही टाकलं होतं. एका ट्विटरकरानं काँग्रेसला धारेवर धरत म्हटले की, काँग्रेस सूट बूट की सरकार म्हणत मोदी सरकारवर टीका करत सुटलेली असताना चुकांचा पाढाही वाचते आहे. अशा किती चुका काँग्रेस सुधारणार आहे ?. एकानं तर राहुल गांधी यांनी काँग्रेसचं हे ट्विटर हँडल वापरणे बंद करावे, अशी सूचनाच केली आहे. तर तिस-या एकानं तर राहुल गांधींना लक्ष्य केलं आहे. ये राहुल गांधी काही काम है. दुनिया में ऐसे इंटेलिजन्ट कोयी हैही नही. जन्म आणि मृत्यूची तारीख तुम्ही बदलली. त्यामुळेच जनतेनं तुम्हाला घरी बसवलं.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधी