शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

चुकीचा इतिहास अस्वस्थ करणारा

By admin | Updated: June 22, 2017 05:16 IST

आजवर शिवरायांचा इतिहास चुकीच्या पद्धतीने शिकवला गेला. ज्ञान देण्याची मक्तेदारी विशिष्ट वर्गाकडे असल्याने त्यांना

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : आजवर शिवरायांचा इतिहास चुकीच्या पद्धतीने शिकवला गेला. ज्ञान देण्याची मक्तेदारी विशिष्ट वर्गाकडे असल्याने त्यांना अभिप्रेत असलेला इतिहास समाजापर्यंत पोहचविण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज मुस्लीमविरोधी होते, अशी प्रतिमा तयार करण्यात आली. आजही विशिष्ट भूमिका समाजासमोर मांडण्याचे आणि तरुणाईच्या मनावर बिंबवण्याचे प्रयत्न केले जात आहेत. या प्रयत्नांना मिळणारे यश अस्वस्थ करते, अशी खंत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी व्यक्त केली. महात्मा जोतीराव फुले इतिहास अकादमीतर्फे श्रीमंत कोकाटे यांच्या ‘छत्रपती शिवाजी महाराज’ या सचित्र ग्रंथाचे प्रकाशन पवार यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज, महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटीन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार, ज्येष्ठ इतिहासतज्ञ डॉ. जयसिंगराव पवार, लेखक श्रीमंत कोकाटे, प्रवीण गायकवाड आदी उपस्थित होते.पवार म्हणाले, शिवरायांनी अफझल खानाच्या रूपात मुसलमानाचा नव्हे, तर शत्रूचा कोथळा बाहेर काढला. अत्याचार, अन्याय, आक्रमणाच्या विरोधात त्यांचा लढा होता. त्यामध्ये त्यांनी जातीधर्माचा विचार केला नाही. मात्र, त्यांचा संघर्ष जाणीवपूर्वक मुस्लिमांपुरता मर्यादित ठेवला गेला. महापुरुषांनी संघर्षाला धार्मिक स्वरूप येऊ दिले नाही. तरीही शाळेत छत्रपतींचा इतिहास वेगळ्या पद्धतीने शिकवला जातो. समाजासमोर इतिहासाची वास्तव मांडणी झाली पाहिजे. जातीवाचक विचार न करता राज्यासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.आपण इतिहास लिहीत नाही, तोपर्यंत इतरांनी लिहिलेला इतिहास वाचावा लागतो. इतिहासाचे लेखन करताना काही मंडळी अडखळली तर त्यांच्याकडे सहानुभूतीने पाहायला हवे, असे सांगून जयसिंगराव पवार म्हणाले, ‘आपल्या मनाला जे पटते ते मांडण्याचा प्रत्येकाला अधिकार असतो. इतिहासाची मांडणी, पुनर्मांडणी करताना सत्य संशोधनाला महत्त्व द्यायला हवे. पुरावे असतील तर सत्य कोणालाही खोडून काढता येत नाही. ‘गोब्राह्मण प्रतिपालक’ हा शब्दप्रयोग अनैतिहासिक असल्याचे ज्येष्ठ इतिहास संशोधक त्र्यंबक शेजवलकर यांनी सिद्ध केले. महात्मा फुले यांनी शिवाजी महाराजांना ‘कुळवाडी भूषण’ ही उपाधी दिली. शिवछत्रपतींचे राज्य कधीच भोसलेंचे नव्हते, तर ते रयतेचे होते. सज्जनांचे संरक्षण आणि दुष्टांचा नाश हे सूत्र त्यांनी पाळले. अठरापगड जातीच्या लोकांना एकत्र घेऊन त्यांनी स्वराज्य निर्माण केले, असे सांगत पवार यांनी शिवरायांच्या कर्तृत्वाचा आलेख मांडला.