ऑनलाइन लोकमतपुणे, दि. 2 : सरकारनामा या दमदार चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीची मरगळ दूर करुन प्रेक्षकांना पुन्हा चित्रपटगृहांकडे आणणारे प्रसिद्ध लेखक-दिग्दर्शक अजेय झणकर (वय ५७) यांचे रविवारी येथील खाजगी रुग्णालयात दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन कन्या असा परिवार आहे. झणकर यकृताच्या विकाराने आजारी होते. त्यांच्यावर येथील रुग्णालयात तीन आठवड्यांपासून उपचार सुरु होते. झणकर यांनी लिहिलेल्या सरकारनामा आणि द्रोहपर्व या दोन्ही कादंबऱ्या विशेष गाजल्या. त्यांच्या अनेक आवृत्याही निघाल्या. या दोन्हीही कादंबऱ्यांवर चित्रपट तयार झाले. सरकारनामा हा राजकीय चित्रपट होता तर द्रोहपर्व कादंबरीवर इंग्रजीमध्ये चित्रपट आला. झणकरांनी लेकरु या वेगळ््या धाटणीच्या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. त्यांची दौलत या शीर्षकाची मालिका प्रचंड गाजली होती. सरकारनामा हा चित्रपट आणि द्रोहपर्व ही कादंबरी दोन्ही राज्य शासनाच्या पुरस्काराच्या मानकरी ठरल्या होत्या. ते पुरस्कारप्राप्त गीतकार सुद्धा होते
लेखक-दिग्दर्शक अजेय झणकर यांचे निधन
By admin | Updated: April 2, 2017 21:50 IST