शहरं
Join us  
Trending Stories
1
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
2
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
3
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
4
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
5
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
6
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
7
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
8
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
9
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
10
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
11
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
12
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
13
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
14
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
15
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
16
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
17
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
18
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
19
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
20
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?

मनगटातील जोर दाखवला...

By admin | Updated: March 9, 2017 04:38 IST

मुंबई महापालिकेवर शिवसेनेचा भगवा पुन्हा एकदा डौलाने फडकला आहे. मराठी माणसाच्या मनगटात किती जोर आहे, हेच त्यांनी दाखवून दिले, असा अप्रत्यक्ष टोला शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव

मुंबई : मुंबई महापालिकेवर शिवसेनेचा भगवा पुन्हा एकदा डौलाने फडकला आहे. मराठी माणसाच्या मनगटात किती जोर आहे, हेच त्यांनी दाखवून दिले, असा अप्रत्यक्ष टोला शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी विजयी सभेतून आज भाजपाला लगावला. शिवसैनिकांचे आभार मानत पक्षावर ही निष्ठा, शिवसेनेची ताकद अशीच कायम ठेवा, असे भावनिक आवाहनही त्यांनी केले.महापौर, उपमहापौरपदी शिवसेनेच्या उमेदवारांची निवड झाल्यानंतर त्यांचे अभिनंदन करण्यासाठी ते पालिका मुख्यालयात आले होते. या वेळी त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे उपस्थित होते. या वेळी मुख्यालयाबाहेर उभारलेल्या व्यासपीठावरून अवघे दीड-दोन मिनिटे भाषण करीत मुंबईकरांचे आभार मानले. ते म्हणाले, मुंबईवर सलग पाचव्यांदा भगवा फडकला आहे. याबाबत मुंबईकरांचे आभार मानण्यास माझ्याजवळ शब्द नाहीत. मुंबईकरांनी जो विश्वास दाखवला आहे, त्यासाठी अविरत सेवा करण्यास मी सदैव तत्पर असल्याची ग्वाही त्यांनी दिली. प्रसारमाध्यमांशी बोलताना मुंबईत काही जागा कमी पडल्या त्याची नक्कीच भरपाई करू. शिवाय ज्यांनी ज्यांनी शिवसेनेला मदत केली, त्या सर्वांचे आभार. मुंबई व ठाण्याचा आनंद अनुभवू द्या. कारण आनंदापेक्षा विजय महत्त्वाचा असतो, असे उद्गार त्यांनी काढले. दरम्यान, प्रसारमाध्यमांनी भाजपाने केलेल्या घोषणांबाबत ठाकरे यांना छेडले असता, कोण काय घोषणा करेल हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मात्र, मला त्या वेळेस ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ हीच घोषणा अपेक्षित होती, असे मत व्यक्त केले.स्मारकासाठी कोणापुढे हात पसरणार नाही. भंपकपणाविरोधातील आमची लढाई यापुढे सुरू राहील. शेतकरी कर्जमाफीसारखे मुद्दे यापुढेही राहतील, असे ठाकरे यांनी स्पष्ट केले. दरम्यान, ही निवडणूक प्रतिष्ठेची करणाऱ्या शिवसेनेने महापौरपदाचा विजयही प्रतिष्ठेचा केला. भाजपाचे संख्याबळ वाढले तरी मुंबईत आवाज शिवसेनेचाच हा संदेश देण्यासाठी मुंबई महापालिका मुख्यालयाबाहेर शक्तिप्रदर्शन करण्यात आले. मोदींच्या जयघोषांनी भाजपानेही आव्हान दिल्यामुळे जुने मित्र पक्ष आपसात भिडले. महापौर व उपमहपौरपदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या केले. एकीकडे समर्थनाची भूमिका घेणाऱ्या भाजपा नगरसेवकांनी मोदी..मोदी अशा जयघोषांने सभागृहात शिवसेनेची कोंडी केली. देवेंद्र फडणवीस जी आगे बढो हम तुम्हारे साथ है अशी घोषणाबाजी सुरु केली. त्यामुळे काहीवेळ नवनिर्वाचित महापौरांनाही भाषण करता आले नाही. त्यामुळे शिवसेनेच्या नगरसेवकांनी ‘एकच साहेब बाळासाहेब’ असे सुचक प्रत्युत्तर दिले.शिवसेना नेते मुख्यालयात भाजपाला ताकद दाखविण्यासाठी शिवसेनेच्या शाखाशाखांमधून शिवसैनिकांची फौज मुख्यालयाबाहेर जमा झाली होती. कोळी नृत्य व गीतांनी मनोरंजनही सुरु होते. महापौर, उपमहापौर निवडीनंतर पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे, शिवसेनेचे मंत्री, नेते, पदाधिकारी महापालिका सभागृहात येऊन नवनिर्वाचित महापौर व उपमहापौरांना शुभेच्छा दिल्या. प्रत्येक निवडणुकीत शिवसेना पक्ष प्रमुख शुभेच्छा देण्यासाठी महापालिका मुख्यालयात येत असले तरी आज त्यांच्याबरोबर मंत्र्यांची फौज होती. दरम्यान, शिवसेनेच्या ताफ्याने वरळी सी फेस ते महापालिका मुख्यालय असा वाजतगाजत प्रवास केला. निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर उध्दव ठाकरे यांनी मुख्यालयाबाहेर विजयी सभा घेत मुंबईकरांचे आभार मानले. त्यानंतर पायी चालत हुतात्मा चौक येथे शहिदांना अभिवादन केले. (प्रतिनिधी)मुख्यालयाबाहेर भगवा जल्लोष एकीकडे सभागृहात भाजपा शक्ति प्रदर्शन करीत असताना महापालिका मुख्यालयाबाहेर भगवा जल्लोष सुरु होता. मुंबईचे पहारेकरी आम्हीच, मुंबई शिवसेनेचीच अशी फलकबाजी शिवसेनेने केली होती. संपूर्ण छत्रपती शिवाजी टर्मिनस परिसर भगवे झेंडे, आकाश कंदीलांनी सजविण्यात आले होते. मुख्यालयाच्या दारात रांगोळी, शोभेचे हत्ती, नगारे ठेवण्यात आले होते. तसेच भव्य व्यासपीठ उभारून त्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंहासनारूढ भव्य प्रतिकृती ठेवण्यात आली होती. कोळी समाजाचा बँड, नाशिकचे ढोल, ताशे सतत वाजत होते. मतदानावेळी मनसे गैरहजरमतदानावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक गैरहजर तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि समाजवादी पार्टीचे नगरसेवक तटस्थ राहिले. महाडेश्वर यांना १७१ मते तर काँग्रेसचे उमेदवार विठ्ठल लोकरे यांना केवळ ३१ मते मिळाली. भाजपाने यंदा उमेदवार न दिल्याने हेमांगी वरळीकर या शिवसेनेच्या पहिल्या उपमहापौर ठरल्या आहेत. वरळीकर यांना १६६ तर त्यांच्या प्रतिस्पर्धी काँग्रेसच्या विनीफ्रेड डिसोजा यांना ३१ मते मिळाली.भाजपाची सारवासारवमुंबईमध्ये राजकीय अस्थिरता टाळण्यासाठी शिवसेनेच्या उमेदवारांना मतदान केले, अशी सारवासारव भाजपचे गटनेते मनोज कोटक यांनी केली.तरीही पारदर्शकतेच्या मुद्यावर कोणतीही तडजोड करणार नाही. महापालिकेतील घोटाळे व भ्रष्टाचारावर भाजपा परखड भूमिका मांडेल. मुंबईकरांच्या हिताच्या प्रस्तावावर बाजूने तर मुंबईकरांच्या हिताच्या विरोधातील प्रस्तावाला कडाडून विरोध करू, असेही मनोज कोटक यांनी पत्रकरांना सांगितले.‘लोकमत’तर्फे उपमहापौरांना शुभेच्छा!जागतिक महिला दिनी विजयाची माळ गळ्यात पडणाऱ्या हेमांगी वरळीकर या शिवसेनेच्या पहिल्या उपमहापौर ठरल्या आहेत. ‘महिला दिनी’ हा बहुमान मिळविल्याबद्दल वरळीकर यांचे ‘लोकमत’तर्फे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले.