शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

मुद्रा लोन योजनेची वाताहत; राज्यात ३३ लाख ग्राहकांनी बुडविले ४,६१९ कोटींचे कर्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2023 06:28 IST

वसुलीसाठी बँकांची धडपड, या योजनेतील कर्जांना कोणतीही प्रोसेसिंग फी नसल्याने मागील पहिली पाच वर्षे कर्ज घेण्यासाठी बँकांमध्ये व्यावसायिक गर्दी करीत होते.

बापू सोळुंकेछत्रपती संभाजीनगर - हातगाडीवर व्यवसाय करणाऱ्या भाजी विक्रेत्यापासून ते मोठ्या व्यापारी, उद्योजकांना विनातारण कर्ज उपलब्ध करणाऱ्या केंद्राच्या महत्त्वाकांक्षी मुद्रा लोन योजनेची महाराष्ट्रात वाताहत झाल्याचे दिसून येत आहे. राज्यातील तब्बल ३३ लाख २६ हजार ५१४ ग्राहकांचे कर्ज बुडीत (एनपीए) निघाल्याची धक्कादायक माहिती प्राप्त झाली आहे. या ग्राहकांनी तब्बल चार हजार ६१९ कोटी दाेन लाखांचे कर्ज थकविले असून, बँकांच्या कर्जवसुली पथकांना ते दाद देत नाहीत.

केंद्र सरकारने ८ एप्रिल, २०१५ रोजी प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना जाहीर केली. यामध्ये शिशू मुद्रा कर्ज योजनेंतर्गत ५० हजारांपर्यंत कर्ज देण्यात येते, तर किशोर मुद्रा योजनेंतर्गत ५०,००१ ते पाच लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळते, तर तरुण मुद्रा योजनेंतर्गत पाच ते दहा लाखांपर्यंत कर्ज सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.

या योजनेतील कर्जांना कोणतीही प्रोसेसिंग फी नसल्याने मागील पहिली पाच वर्षे कर्ज घेण्यासाठी बँकांमध्ये व्यावसायिक गर्दी करीत होते. बँकांना मुद्रा योजनेंतर्गत कर्ज वाटपाचे उद्दिष्ट असल्याने बँकांनीही बिनधास्त कर्ज वाटप केले. मात्र, आता हे कर्ज वाटप करणे बँकांच्या अंगलट आल्याचे दिसून येत आहे.

कर्ज विनातारण असल्याने बुडीतचा प्रकार अधिक   पंतप्रधान मुद्रा कर्ज योजनेंतर्गत कर्ज घेतल्यानंतर, या कर्जाची परतफेड करणाऱ्या मोठ्या कर्जदारांना दहा टक्के अनुदान मिळते. असे असूनही तरुण योजनेंतर्गत तब्बल ७० हजार ३६ व्यावसायिकांनी मुद्रा योजनेतील कर्जाची परतफेड केली नाही. या कर्जदारांकडे १,३१४ कोटी ४५ लाख रुपये विविध बँकांची थकबाकी आहे. तज्ज्ञांच्या मते विनातारण कर्ज देण्याची योजना असल्याने बँकांना कर्ज वसुली करताना अडचणी येतात. परिणामी, बुडीत कर्ज वाढते. मुद्रा योजनेंतर्गत कर्ज घेऊन ते बुडविणाऱ्या राज्यातील ३६ जिल्ह्यांमध्ये परभणी जिल्हा अव्वल आहे. विविध बँकांकडून मुद्रा योजनेंतर्गत कर्ज घेतलेल्या एकूण ग्राहकांच्या ५२ टक्के व्यावसायिक, उद्योजकांनी कर्जाची परतफेड केली नसल्याचे दिसून येते.

राजकीय हेतूने कर्ज वाटले गेले आहे. ज्या कारणासाठी कर्ज घेतले, त्यासाठीच कर्जाचा विनियोग झाला नाही. ही कर्जे वाटप करताना कर्जदारांनी जोडलेली कोटेशन, त्यावरील जीएसटी तपासला, तर कितीतरी बोगस कर्ज प्रकरणे हुडकून काढता येतील. - देवीदास तुळजापूरकर, सहसचिव, ऑल इंडिया बँक एम्प्लॉइज असोसिएशन

टॅग्स :bankबँक