शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
7
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
8
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
9
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
10
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
11
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
12
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
13
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
14
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
15
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
16
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
17
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
18
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
19
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डतर्फे जागतिक स्वच्छता दिन

By admin | Updated: September 18, 2016 01:56 IST

महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डतर्फे शनिवारपासून सुरू करण्यात आलेले ‘निर्मल सागर तट’ अभियान २ आॅक्टोबरपर्यंत राबविण्यात येणार

मुरुड : महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डतर्फे शनिवारपासून सुरू करण्यात आलेले ‘निर्मल सागर तट’ अभियान २ आॅक्टोबरपर्यंत राबविण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील सर्व सागरी किनारे स्वच्छ व सुंदर करण्यासाठी जागतिक सागर तट स्वच्छता दिनाचे औचित्याने मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. काशीद समुद्र किनारी दरवर्षी पाच लाखापेक्षा जास्त पर्यटक भेट देत असून हा किनारा स्वच्छ व सुशोभित करण्याकडे अधिकाधिक लक्ष दिले जाणार आहे. मोहीमेसाठी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाने ज्येष्ठ निरु पणकार अप्पासाहेब धर्माधिकारी यांची भेट घेऊन नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे सहकार्य मिळवत असंख्य श्री सदस्यांचा सहभाग मिळवला. स्वछता मोहिमेत काशीद ग्रामस्थ, प्राथमिक शाळा रायगड जिल्हा परिषद काशीद, माध्यमिक विद्यालय काशीद येथील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. स्वच्छता अभियानातून ५० टन कचरा गोळा करण्यात आला. (वार्ताहर)मोहीम अभियानापुरती मर्यादित राहू नये - तेलीअलिबाग : निरोगी आरोग्यासाठी स्वच्छता महत्वाची असून ही मोहीम केवळ अभियानपुरती मर्यादित न ठेवता नियमित असावी. यासाठी प्रत्येकाने स्वच्छतेची सवय बाळगून परिसर स्वच्छ ठेवण्याचे काम करावे, असे आवाहन रायगडच्या जिल्हाधिकारी शीतल तेली-उगले यांनी शनिवारी येथे केले. आंतरराष्ट्रीय सागरी किनारा स्वच्छता दिनानिमित्त निर्मल सागर तट स्वच्छता मोहिमेअंतर्गत, कोस्टगार्ड महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड, रायगड जिल्हा प्रशासन, डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा आणि स्वयंसेवी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने समुद्र किनारा स्वच्छता मोहिमेच्या शुभारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आर.जे. नार्वेकर, अपर जिल्हाधिकारी पी.डी. मलिकनेर, अलिबाग प्रांताधिकारी सर्जेराव सोनावणे, मेरीटाईम बोर्डाचे कॅप्टन सुरज नाईक, कोस्टगार्ड कंमाडर रणजितकुमार सिंग, तहसिलदार प्रकाश संकपाळ आदी मान्यवर उपस्थित होते.