शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

कामगारांचा आज संप, वीज पुरवठ्यावर परिणाम; सुरळीत वीज पुरवठ्यासाठी महावितरण सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 06:47 IST

गंभीर कारणास्तव घेतलेल्या रजा वगळून अभियंते, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची बुधवारची रजा रद्द करण्यात आली आहे.

मुंबई - वीज क्षेत्राचे खासगीकरण करू नये या मागणीसाठी महावितरण, महानिर्मिती आणि महापारेषणचे राज्यभरातील हजारो कायम तसेच कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांनी बुधवारी (दि.९) संप पुकारला आहे. त्याचा परिणाम वीज पुरवठ्यावर होण्याची शक्यता गृहीत धरून महावितरणने सर्व पर्यायी व्यवस्था, उपाययोजना केल्या आहेत. 

घरगुती ग्राहकांसह पाणीपुरवठा योजना, रुग्णालये, मोबाईल टॉवर्स, शासकीय कार्यालये यांचा वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याची खबरदारी महावितरणने घेतली आहे. ज्या ठिकाणचा वीजपुरवठा खंडित होईल तेथे सर्वप्रथम पर्यायी व्यवस्थेतून (बॅकफिड) वीजपुरवठा सुरू करण्यात येईल. रोहित्र, ऑइल, वीजतारा, केबल्स, वीजखांब, फिडर पिलर्स, डिस्ट्रिब्युशन बॉक्सेस, वाहतुकीसाठी वाहने आदी सामुग्री वीज कंपन्यांच्या कार्यालयांमध्ये सज्ज ठेवण्यात आली आहे. गंभीर कारणास्तव घेतलेल्या रजा वगळून अभियंते, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची बुधवारची रजा रद्द करण्यात आली आहे.

‘आवश्यक साधने उपलब्ध ठेवा’क्षेत्रीय विभाग कार्यालयांच्या निवड सूचीवर असलेल्या सर्व कंत्राटदारांना आवश्यक साधनसामुग्री, मनुष्यबळ आणि वाहनांसह संबंधित कार्यालयांमध्ये उपलब्ध राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. संपात सहभागी नसलेले महावितरणचे कर्मचारी, बाह्यस्त्रोत कर्मचारी, महावितरणचे कंत्राटदार आणि कर्मचारी यांची स्थानिक कार्यालये, उपकेंद्रांत तात्पुरती नियुक्ती करण्यात आली आहे. 

महावितरणचे आवाहननागरिकांनी वीज पुरवठ्याबाबत नकारात्मक आणि चुकीच्या संदेशावर, अफवांवर विश्वास ठेवू नये.वीज पुरवठ्याबाबत तक्रारी किंवा शंका असल्यास टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा. 

आपत्कालीन व्यवस्था महावितरणचे मुख्यालय आणि क्षेत्रीय परिमंडल कार्यालयांमध्ये स्वतंत्र नियंत्रण कक्ष सुरूदर तासाला राज्यातील वीज पुरवठ्याची स्थिती वरिष्ठ अधिकारी आणि मुख्यालयाला कळविणारवीज पुरवठ्यासाठी पर्यायी मनुष्यबळाची उपलब्धता

टॅग्स :mahavitaranमहावितरण