शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
3
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
4
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
5
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
6
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
7
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
8
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
9
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
10
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
11
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
12
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
13
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
14
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
15
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
16
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
17
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर
18
'निराधार आणि बेजबाबदार'; राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने सोडले मौन, काय दिले उत्तर?
19
IND vs ENG 5th Test: Gus Atkinson चा 'पंजा'! टीम इंडियानं २० धावांत गमावल्या ४ विकेट्स! अन्...
20
सेबीच्या नियमांना फाटा देऊन शेअर्सची खरेदी-विक्री, पण धोकाही मोठा! 'ग्रे मार्केट'ची Inside Story

बँकेला साखरेचा ताबा घेण्यापासून कामगारांनी रोखले

By admin | Updated: May 7, 2016 01:27 IST

जिजामाता साखर कारखाना : छावणीचे स्वरुप, धक्काबुक्कीत १ कर्मचारी गंभीर.

दुसरबीड (बुलडाणा): थकीत कर्जापोटी जिजामाता साखर कारखान्याची १४ हजार १४0 साखरेची पोती ताब्यात घेण्याचा बुलडाणा अर्बन बँकेचा प्रयत्न कामगारांनी ६ मे रोजी हाणून पाडला. कर्मचार्‍यांनी साखरेचे ट्रक रोखल्यामुळे, पोलिस आणि कर्मचार्‍यांमध्ये धक्काबुक्की झाली. यात १ कर्मचारी गंभीर जखमी झाला. ३ कर्मचारी पाल्यांना पोलिसांनी अटक केली असून, या प्रकारामुळे तणाव निर्माण होऊन, घटनास्थळाला पोलिस छावणीचे स्वरुप आले होते. जिजामाता शुगर्स मिल प्रायव्हेट लिमीटेडने सन २0११ मध्ये बुलडाणा अर्बनकडून १0 कोटी रूपये कर्ज घेतले होते. त्यापैकी जवळपास ५ कोटीचा भरणा केला असून, ५ कोटी रूपये जिजामाता शुगर्स मिलकडे थकीत होते. त्या अनुषंगाने बुलडाणा अर्बनने ६ मे रोजी कर्ज वसुलीसाठी पोलिस प्रशासनाचा तगडा बंदोबस्त लावून कारखान्यातील जवळपास ५ ट्रक साखर ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. कर्ज वसुलीसाठी ही मोहीम रितसर परवानगी घेऊन राबविली जात होती; मात्र कर्मचार्‍यांना माहिती मिळताच त्यांनी कारखानाच्या प्रवेशद्वारावर नारेबाजी करून, विरोध केला. त्यामुळे पोलिस व कर्मचार्‍यांमध्ये धक्काबुक्की झाली. यात कर्मचारी नुरखाँ पठाण गंभीर जखमी झाल्यामुळे, त्यांना जालना येथे हलविण्यात आले. अन्सार पठाण, अरुण भुसारी, शे.दस्तगीर या तीन कर्मचारी पाल्यांना पोलिसांनी स्थानबद्ध केले. सरपंच छगन खंदारे आणि युवा सेनेचे प्रमुख अविनाश चव्हाण यांनी साखर ताब्यात घेण्याच्या आदेशाची प्रत मागितली असता, नायब तहसिलदार माळी यांनी २0१३ च्या आदेशाची प्रत दाखवल्याने एकच खळबळ उडाली. दरम्यान अविनाश चव्हाण यांनी दुरध्वनीद्वारे यासंदर्भात आ.शशिकांत खेडेकर यांच्याशी चर्चा करून, आंदोलन थांबविण्यासाठी प्रयत्न केले. साखर ताब्यात घेण्याची प्रक्रिया थांबविल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली. दंगल नियंत्रण पथकातील ४0 कर्मचारी, १0 पोलिस अधिकारी, १ डीवायएसपी, २0 महिला पोलिस, तर २0 पुरुष पोलिसांचा ताफा घटनास्थळी तैनात होता. पुढील आदेशापर्यंत स्थगितीकामगार नेते कॉ. राजन चौधरी यांनी साखर काढण्यासंदर्भात प्रखर विरोध करून, अगोदर कर्मचार्‍यांची कारखान्याकडील थकबाकी द्यावी, नंतरच साखरेला हात लावावा, असा पवित्रा घेत अवसायकांची कर्मचार्‍यांच्या थकबाकीबद्दलची भूमिका काय आहे, हे लेखी स्वरुपात द्यावे, अशी मागणी केली. यावेळी अप्पर जिल्हा पोलिस अधिक्षक श्‍वेता खेडकर, उपविभागीय अधिकारी डॉ.सचिन खल्ल्याळ, तहसिलदार राजेश सुरडकर, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत परदेशी, कामगार नेते राजन चौधरी यांच्यात चर्चा झाली. त्यानुसार प्रशासनाचा पुढील आदेश येईपर्यंत साखर काढण्यास स्थगिती देण्यात आली. त्यामुळे ५ ट्रक साखर पुन्हा गोदामात जमा करण्यात आली.