शहरं
Join us  
Trending Stories
1
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ
2
'निवडणूक आयोग-भाजपचे साटेलोटे; मतांची चोरी करू देणार नाही', राहुल गांधींनी ठणकावले
3
आजचे राशीभविष्य, २५ ऑगस्ट २०२५: आजचा दिवस लाभदायी, वाद-विवाद टाळा, वाणीवर संयम ठेवा !
4
साहेब ! पाचवीतील विद्यार्थ्याचा पास संपला म्हणून त्यास भर पावसात बसमधून खाली उतरणार का?
5
विशेष लेख: जरा संभलके, बडे धोखे है इस राह में...
6
भारताने रशियाच्या तेलाबद्दल ट्रम्प यांचे मत गांभीर्याने घ्यावे, निक्की हेली यांचं विधान
7
शिवकुमारांनंतर काँग्रेस आमदारानेही गायले संघाचे गीत
8
मंदिरांत राजकीय उपक्रम नकोत; खातरजमा करा, केरळमधील देवस्वोम मंडळांना कोर्टाचे निर्देश
9
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
10
अधिक काम करतो, पण मोबदलाही द्या; वाढत्या कामामुळे होतोय जगण्यावर नकारात्मक परिणाम
11
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
12
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
13
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
14
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
15
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
17
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
18
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
19
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
20
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...

‘स्वत:ची कंपनी समजून काम करा; यश तुमचेच’

By admin | Updated: January 24, 2017 03:45 IST

दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर जगातील कोणतीही गोष्ट अशक्य नाही. ज्याठिकाणी तुम्ही काम करता ते काम स्वत:चे समजून केले तर

औरंगाबाद : दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर जगातील कोणतीही गोष्ट अशक्य नाही. ज्याठिकाणी तुम्ही काम करता ते काम स्वत:चे समजून केले तर तुमच्या प्रगतीत कोणीही अडथळा आणू शकणार नाही. यश तुमचेच असल्याचा गुरुमंत्र प्रसिद्ध उद्योगपती व भारत विकास ग्रुपचे (बीव्हीजी) संचालक हनुमंत गायकवाड यांनी दिला.औरंगाबादमधील देवगिरी अभियांत्रिकी व व्यवस्थापनशास्त्र महाविद्यालयात आयोजित ‘क्वसार्स-२०१७’ या विद्यार्थी स्नेहसंमेलनाच्या उद्घाटनासाठी उद्योगपती हनुमंत गायकवाड आले होते. यावेळी त्यांनी उद्योजकतेचा प्रवास विद्यार्थ्यांसमोर मांडला. कोर्टात क्लर्क असलेल्या कुटुंबात जन्म झाला. गरिबीत कुटुंब गुजराण करीत होते. पुढे वडिलांची पुण्यातील फुगेवाडी येथे बदली झाल्यामुळे गाव सोडावे लागले. तेव्हा ९ बाय १८ च्या खोलीत आमचे सर्व कुटुंब राहत होते. याच वेळी वडील सतत आजारी पडत असल्याने आई त्यांना ससून रुग्णालयात दाखल करीत असे. एक वेळ पैसे नसल्यामुळे आईने मंगळसूत्र, कानातील दागिने ७०० रुपयांत गहाण ठेवले होते. या गरिबीतून धडा घेत मोठे बनण्याचे स्वप्न पाहिले; यासाठी मेहनत घेत गेलो; यश मिळत गेले. आज ‘बीव्हीजी’मध्ये तब्बल ६५ हजार कर्मचारी काम करतात. सर्वांच्या सहकार्याने गरिबीची जाण ठेवून सेवा देत असल्याचे हनुमंत गायकवाड यांनी सांगितले. (प्रतिनिधी)१९ व्या वर्षी ‘बीव्हीजी’ची स्थापनाभविष्याचा विचार करीत वयाच्या १९ व्या वर्षी भारत विकास ग्रुपची स्थापना केली. टाटा मोटार्समध्ये हाऊस किंपिगच्या कामांचा अनुभव होता. २००१ साली टाटा मोटार्स सोडताना हातात काहीच नव्हते. त्याचवेळी बंगलोर येथे काम मिळाले. तेथून चेन्नई, हैदराबाद, दिल्लीत कामे मिळाली. पुढे संसदेत काम करण्याची संधी चालून आली. प्रत्येक ठिकाणी सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न मिळाल्यामुळे आज संसद, राष्ट्रपती भवन, पंतप्रधान निवास, उपराष्ट्रपती कार्यालय, सर्वोच्च न्यायालयातील हाऊसकिपिंगचे काम बीव्हीजी करत आहे. देशातील प्रथम क्रमांकाची हाऊस किपिंग कंपनी बनण्यास विश्वासू साथीदाराचा सर्वात मोठा वाटा असल्याचेही हनुमंत गायकवाड यांनी सांगितले.विवेकानंदांना आदर्श मानले : विवेकानंद, छत्रपती शिवाजी महाराज, नेपोलियन बोनापार्ट यांची चरित्रे वाचण्यात आली. यातून आदर्श घेतल्याचे ते म्हणाले.१०८ क्रमांक जाळे :महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेस म्हणजेच १०८ क्रमांकाची सेवा बीव्हीजी देत आहे. राज्यात साडेनऊशे अ‍ॅम्ब्युलन्स चालविण्यात येतात. दररोज शेकडो लोकांना आरोग्याची सेवा देण्यात येते हेच जनकल्याणचे काम असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या २२ राज्यांतील ७०० शहरांमध्ये कंपनीची कामे सुरूअसून, ६५ हजार कर्मचारी काम करीत आहेत. हे सर्व यश १५ वर्षांत मिळवले असल्याचे हनुमंत गायकवाड यांनी स्पष्ट केले. याशिवाय कृषी, दुग्ध क्षेत्रातही कार्य सुरू केल्याचे त्यांनी सांगितले.ढोलांच्या गजरात स्वागत क्वसार्स महोत्सवाच्या उद्घाटनासाठी महाविद्यालयात पोहोचताच विद्यार्थ्यांनी उद्योगपती हनुमंत गायकवाड, अमरावतीचे जिल्हाधिकारी किरण गिते यांचे ढोल-ताशांच्या गजरात आणि लेझीमने स्वागत केले. या आनंदी वातावरणात हनुमंत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाने विद्यार्थी भारावून गेले होते.