शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्पच्या ५०% टॅरिफने भारतीय उद्योगात खळबळ, पण आनंद महिंद्रांना दिसली 'संधी', दिले २ महत्त्वाचे सल्ले!
2
शरद पवार गटात नवे प्रदेशाध्यक्ष केवळ नामधारी? शशिकांत शिंदे नाही, रोहित पवारच अधिक सक्रिय
3
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
4
२०१८ मध्ये बनला उड्डाणपूल, २७ कोटींचा खर्च; अवघ्या ६ वर्षात BMC करणार जमीनदोस्त, कारण काय?
5
थोडीथोडकी नाही...! इथेनॉल-मिश्रित पेट्रोलमुळे मायलेजमध्ये १५-२०% घट; वाहन मालकांचा सर्व्हे आला...
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमक्यांपुढे झुकले टीम कुक; ₹८७,७७३२ कोटींची गुंतवणूक, Apple ची मोठी घोषणा
7
आकाशात उडत होतं विमान, अचानक धडकला मोठा पक्षी; विमानाचं मोठं नुकसान, प्रवासी थोडक्यात बचावले!
8
ट्रम्प टॅरिफनंतर शेअर बाजारात मोठी घसरण, Sensex २८१ अंक आणि Nifty ११० अंकांच्या घसरणीसह उघडले; 'यांना' सर्वाधिक नुकसान
9
जान्हवी कपूरचा संताप, ३० लाख भटक्या कुत्र्यांना मारण्याच्या निर्णयावर केली टीका
10
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
11
कबुतर जा...जा...जा..., की कबुतर आ...आ...आ...? दादरमध्ये तणाव; जैन समाजबांधव आक्रमक, पाेलिसांशीही झाला वाद
12
Donald Trump US Tariffs: लेदरपासून ज्वेलरीपर्यंत… डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा कुठे-किती होणार परिणाम? पाहा संपूर्ण यादी
13
काटली जवळ हिट अँड रन, मॉर्निंग वॉकला गेलेले तीन युवक ठार; मालवाहू ट्रक बनला काळ!
14
घरात शिरला, दरवाजा लावला, मित्राच्या पत्नीला संपवलं अन्...; तरुणाच्या कृत्याने परिसर हादरला!
15
जुनी वह्या-पुस्तके परत द्या; पुनर्वापरातून परिवर्तनाकडे नेणार ‘ज्ञानपत्र योजना’ 
16
तिसरा श्रावण शुक्रवार: शुभ-पुण्य मिळेलच, लक्ष्मी देवी वरदान देईल; ‘असे’ करा वरदलक्ष्मी व्रत
17
रशियाशी व्यापार केल्याबद्दल फक्त भारतालाच का लक्ष्य केले? ट्रम्प म्हणाले, 'आता फक्त ८ तास...'
18
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
19
Raksha Bandhan 2025:रक्षाबंधनाला 'या' पाच गोष्टी औक्षण थाळीत असायलाच पाहिजेत!
20
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण

कष्ट करा, यशाच्या आड जात, धर्म येणार नाही!

By admin | Updated: June 23, 2017 01:45 IST

मी कोर्टात चपराशी होतो. कष्ट केले, कर्तृत्व दाखविले अन् मोठा झालो. आपण सर्वांनीच जर निवडलेल्या क्षेत्रात कष्ट घेतले तर तुम्ही कोणत्याही जाती-धर्माचे असा

लोकमत न्यूज नेटवर्कसोलापूर : मी कोर्टात चपराशी होतो. कष्ट केले, कर्तृत्व दाखविले अन् मोठा झालो. आपण सर्वांनीच जर निवडलेल्या क्षेत्रात कष्ट घेतले तर तुम्ही कोणत्याही जाती-धर्माचे असा; ते तुमच्या आड येणार नाही. तुम्ही नक्की यशस्वी व्हाल, असा विश्वास माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी गुरुवारी येथे व्यक्त केला.‘लोकमत’ने प्रकाशित केलेल्या ‘आयकॉन्स आॅफ सोलापूर-२’ या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन शिंदे यांच्या हस्ते शानदार समारंभात झाले, त्यावेळी ते बोलत होते. ‘लोकमत’चे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा अध्यक्षस्थानी होते. पालकमंत्री विजयकुमार देशमुख, भारत विकास ग्रुपचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक हणमंतराव गायकवाड प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. महापौर शोभा बनशेट्टी,‘एआरपीआय’ ग्रुप आॅफ कंपनीजच्या प्रमुख इंदुमती अलगोंड मंचावर होते.शिंदे म्हणाले, ‘लोकमत’चे हे कॉफी टेबल बुक युवकांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. यामधील सर्वच आयकॉन्सनी विविध क्षेत्रात यश मिळविलेले आहे. त्यांनी केलेल्या परिश्रमामुळेच ते यशाचे मानकरी ठरले आहेत. त्यामुळे प्रत्येकानेच कष्ट करून हिमतीने पुढे आले पाहिजे. ‘बीव्हीजी’ ग्रुपचे हणमंतराव गायकवाड यांच्या कार्याचाही शिंदे यांनी गौरव केला. गायकवाड म्हणाले की, स्वामी विवेकानंद यांच्या प्रेरणेतून भारत विकास ग्रुपचे काम सुरू आहे. देशाला महासत्ता बनविण्यासाठी स्वामीजींना १०० युवक हवे होते. त्यातील मी एक आहे, असे स्वत:ला समजतो. राजेंद्र दर्डा यांनी ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराज यांचे स्मरण आणि चार हुतात्म्यांच्या कार्याचा गौरव करून भाषणाला सुरुवात केली. सोलापूर ही गुणवंतांची खाण आहे. पारंपरिक वाटा धुडकावून वेगळ्या क्षेत्रात प्रवेश करणारे अनेक उद्यमशील उद्योजक सोलापूरकर आहेत. येत्या काही वर्षात सोलापूर हे ‘स्मार्ट सिटी’ म्हणून उदयास येत आहे; पण या शहराचे काही प्रश्न आहेत. ‘लोकमत’ अनेकवेळा हे प्रश्न मांडून सोलापूरकरांना मंच उपलब्ध करून दिला आहे; पण याबरोबरच विकासासाठी झटून यश संपादन करणाऱ्या आणि खऱ्या अर्थाने आयकॉन असणाऱ्या व्यक्तींना प्रोत्साहन देणेही गरजेचे असते. हे आयकॉन्स युवकांना सदैव प्रेरणादायी असतात. त्यांची यशोगाथा मांडण्यासाठीच ‘आयकॉन्स आॅफ सोलापूर’ हे कॉफी टेबल बुक प्रकाशित करण्यात येत आहे, असे दर्डा यांनी सांगितले. पालकमंत्री देशमुख यांनी ‘लोकमत’च्या आयकॉन्स आॅफ सोलापूरमध्ये प्रेरणादायी व्यक्तींची वाटचाल मांडली आहे, असे सांगितले .‘लोकमत’चे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा म्हणाले की, कोणतेही काम छोटे नसते; पण ते मनापासून केले पाहिजे. मीही टेलिफोन आॅपरेटरचे काम केले. रेस्टॉरंटमध्ये काम केले. लंडनमध्ये हे करताना शिक्षणात सुवर्णपदक मिळवून भारतात आलो. यवतमाळच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकून ‘जे. जे. महाविद्यालयात प्रवेश घेतला. तेथे शिष्यवृत्ती मिळवून लंडनला शिकायला गेलो. आपले सुशीलकुमार शिंदे हेही स्वत:च्या पायावर उभे राहून मोठे झाले. त्यांनीही जीवनात चपराशासारखी छोटी कामे केली आणि आपल्या कर्तृत्वाने मोठे झाले, असेही दर्डा म्हणाले.‘लोकमत’ माझा पेपर!सुशीलकुमार शिंदे यांनी स्वातंत्र्यसेनानी स्व. जवाहरलालबाबूजी दर्डा यांच्याशी राहिलेल्या स्नेहपूर्ण संबंधाचा उल्लेख करून ‘लोकमत’ हा माझा पेपर असल्याचे सांगितले. स्व. जवाहरलालजी दर्डा आमदार असताना ते हाऊसिंग कॉर्पोरेशनचे अध्यक्ष होते. त्यांच्याकडे मी दलितांच्या गृहनिर्माण प्रकल्पासाठी कर्ज मागायला गेलो होतो. त्यांनी ते तत्काळ मंजूर केल्याची आठवण शिंदे यांनी सांगितली.