शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

महिला सशक्तीकरणाला २४ तासांतच लागला ब्रेक; सक्षम अधिकाऱ्याच्या नेमणुकीनंतर निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2023 08:11 IST

सध्या गणेशोत्सव सुरू असल्याने त्यावर अंतिम निर्णय घेण्यास विलंब होत आहे.

मनोज मोघेमुंबई : महिला व बाल विकास विभागाकडून महिला सशक्तीकरण अभियानाचा शासन निर्णय जारी करण्यात आला. विशेष म्हणजे नुसते महिला सशक्तीकरण अभियान नाही तर मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान म्हणून याची घोषणा करण्यात आली. मात्र, एक काेटी महिलांच्या राेजगाराचा संकल्प करणाऱ्या या अभियानाचा शासन निर्णय अवघ्या २४ तासांत स्थगित करावा लागला आहे.

अभियान जाहीर झाले, पण अंमलबजावणी करताना  समन्वय कशा पद्धतीने ठेवावा? महिला व बाल विकास विभागाचे म्हणणे अन्य विभाग कसे ऐकणार, असा पेच निर्माण झाल्याने अखेर सक्षम अधिकारी नेमूनच हे अभियान चालवावे, असे ठरल्याने त्यानंतरच नवीन शासन निर्णय काढून हे अभियान सुरू होणार  असून महिलांना प्रतीक्षा करावी लागेल.

काय आहे  अभियान ?अभियानात सर्व जिल्ह्यांतील शक्ती गटांना आणि महिला बचत गटांना शासनाच्या विविध विभागांच्या योजनांची माहिती देणे. विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी त्यांची पात्रता तपासून प्रस्तावित लाभार्थी महिलांची यादी तयार करणे. योजनांचे लाभ घेण्यासाठी  अर्ज भरून घेणे. ही प्रक्रिया करून प्रत्येक  जिल्ह्यात किमान अडीच लाख महिलांना या योजनेच्या माध्यमातून जोडण्यात येणार. तालुकास्तरावर तीस हजार व प्रत्येक गावात २०० महिला अभियानात जोडल्या जातील. यातून एक कोटी महिलांना रोजगार उपलब्ध करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

मुख्य सचिव किंवा सीएमओतील अधिकारीआता हे अभियान राबवायचे असेल तर एक तर ही योजना मुख्य सचिव मनोज सौनिक यांच्या नेतृत्वात किंवा मुख्यमंत्र्यांच्या नावाने ही योजना सुरू झाल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात योजना राबविली जाण्याची शक्यता आहे. मात्र सध्या गणेशोत्सव सुरू असल्याने त्यावर अंतिम निर्णय घेण्यास विलंब होत आहे. गांधी जयंतीपासून या अभियानाची सुरुवात करायची असल्याने पुढील आठवड्यात तरी निर्णय घ्यावाच लागेल.