शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील ‘त्या’ महिलांना रेशनिंगवर मोफत नॅपकिन, मेपासून लागू करण्याचे आश्वासन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 02:22 IST

राज्यातील कर्करोगग्रस्त, अपंग आणि दारिद्र्यरेषेखालील महिलांना रेशनिंगवर मोफत सॅनिटरी नॅपकिन पुरवण्याची योजना १ मेपासून लागू करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महिला व बाल विकासमंत्री पंकजा मुंडे यांनी दिले आहे.

मुंबई : राज्यातील कर्करोगग्रस्त, अपंग आणि दारिद्र्यरेषेखालील महिलांना रेशनिंगवर मोफत सॅनिटरी नॅपकिन पुरवण्याची योजना १ मेपासून लागू करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महिला व बाल विकासमंत्री पंकजा मुंडे यांनी दिले आहे. त्यानंतर आझाद मैदानात सुरू असलेले उपोषण विचारधार ग्रामीण विकास संस्थेच्या सरचिटणीस छाया काकडे यांनी गुरुवारी मागे घेतले.महिलांना रेशनिंगवर मोफत सॅनिटरी नॅपकिन मिळावे, म्हणून गेल्या आठवड्याभरापासून काकडे आझाद मैदानात उपोषण करत आहेत. सह्याद्री अतिथीगृहावर गुरुवारी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी सदर आश्वासन दिल्याची माहिती काकडे यांनी ‘लोकमत’ला दिली. यासंदर्भातील अहवाल मंगळवारपर्यंत शासनाकडे सादर करणार असल्याचेही काकडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. आठवडाभर उपोषण केल्यानंतर काकडे यांची तब्बेत बुधवारी खालावली होती. त्यांना गोकुळदास तेजपाल रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले होते. मात्र, उपचार घेण्यास किंवा रुग्णालयात दाखल करून घेण्यास काकडे यांनी नकार दिला. तसेच आझाद मैदानातील उपोषण सुरूच ठेवले. अखेर आझाद मैदान पोलिसांनी मध्यस्थी करत मुख्यमंत्री आणि महिला व बालविकासमंत्री यांची संयुक्त भेट घडवल्याचे काकडे यांनी सांगितले.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र