नागपूर : सांगली जिलतील तासगाव येथील प्रचार सभेत बोलताना महिलांबाबत मानहानीकारक विधान करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी गृहमंत्री आर.आर.पाटील यांच्यावर महिलांनी बहिष्कार टाकावा, असे आवाहन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी केले.
त्याचबरोबर या मुद्यावर राष्ट्रवादीने त्यांची भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणीही त्यांनी केली. बलात्काराच्या प्रकरणातील आरोपींना शिक्षा होण्याचे प्रमाण राज्यात कमी असताना आणि राज्यातील कायदा व सुव्यवस्था रसातळाला गेली असताना माजी गृहमंत्र्याने असे विधान करावे हे धक्कादायक आणि राज्यासाठी अशोभनीय आहे. जनतेने त्यांना या निवडणुकीत धडा शिकवावा, असे फडणवीस म्हणाले. (प्रतिनिधी)