शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
3
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
4
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
5
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
6
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
7
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
8
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
9
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
10
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
11
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
12
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
13
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
14
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
15
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
16
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
17
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
18
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
19
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
20
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
Daily Top 2Weekly Top 5

दारूला विरोध केल्याने महिला सरपंचावर अ‍ॅसिड हल्ला

By admin | Updated: May 18, 2015 03:39 IST

म्हैसगाव येथे दारुविक्रीला विरोध करणाऱ्या महिला सरपंचावर अ‍ॅसिड हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विशेष म्हणजे हैसगाव

राहुरी : म्हैसगाव येथे दारुविक्रीला विरोध करणाऱ्या महिला सरपंचावर अ‍ॅसिड हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विशेष म्हणजे हैसगाव येथे महाराष्ट्र दिनी दारुबंदीचा ठराव करण्यात आला होता. मात्र त्यानंतर तेथे दारूविक्री सुरूच आहे.शनिवारी सरपंच सुजाता पवार यांच्यासह काही महिला दारुविक्रीला विरोध करण्यासाठी व्यावसायिकांकडे गेल्या होत्या. एका ठिकाणी महिलाच दारुविक्री करीत होती. तेव्हा सरपंच व इतर महिलांनी तिला समजावण्याचा प्रयत्न केला. तू एक महिला आहेस. दारुविक्रीचा व्यवसाय बंद कर. तुला दुसरा व्यवसाय सुरू करण्यासाठी आम्ही मदत करू, अशी ग्वाही सरपंच पवार यांनी दिली. परंतु त्याचा राग आल्याने दारुविक्रेत्या महिलेने पवार यांच्यावर अ‍ॅसिड फेकले. त्यात त्यांच्या साडीने पेट घेतला तसेच त्या किरकोळ जखमी झाल्या. त्यानंतर संतप्त महिलांनी राहुरी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आशू भोकरे या महिलेविरुद्ध तक्रार दिली.एकीकडे अहमदनगर जिल्ह्यात दारुबंदीसाठी व्यापक प्रयत्न होत असताना हा धक्कादायक प्रकार घडला आहे. महाराष्ट्र दिनाच्या ग्रामसभेत तब्बल अर्ध्या जिल्ह्यात दारुबंदीचे ठराव झाले. परंतु त्यानंतरही अनेक ठिकाणी सर्रासपणे दारूविक्री सुरू आहे. (प्रतिनिधी)