मुंबई: महिलांवर होणाऱ्या अन्यायांना आळा घालण्यासाठी प्रत्येक मोबाईल सिम कार्डमध्ये महिला हेल्पलाईन क्रमांक १०३ व १०९१ समाविष्ट करण्याची मागणी केंद्र सरकारच्या दूरसंचार विभागाने मान्य केली आहे. यासंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने अंधेरी पूर्व येथील दूरसंचार विभागाच्या उपसंचालकांची भेट घेतली होती. त्यावेळी उपसंचालकांनी मागणी मान्य करण्याचे आश्वासन दिले आहे.प्रत्येक मोबाईल सिमकार्डमध्ये पोलीस हेल्पलाईन क्रमांक १०० व अग्निशमन हेल्पलाईन क्रमांक १०१ यांचा समावेश असतो. त्याचप्रमाणे महिला व बालकांसाठीचा हेल्पलाईन क्रमांक १०३ व १०९१ यांचाही समावेश असावा, अशी मागणी मनसेने मुंबई पोलीस आयुक्त दत्तात्रय पडसलगीकर यांच्याकडेही केली होती. (प्रतिनिधी)सर्व महिलांसाठी उपयुक्त मागणीमनसेची मागणी सर्वच महिलांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणारी असल्याने लवकरच मागणीवर प्रत्यक्ष कार्यवाही केली जाईल. त्यासाठी केंद्रीय दूरसंचार मंत्रालयाला यासंबंधी मागणी करणारे पत्र पाठवले जाईल. मिदन मोहन, उपसंचालक, दूरसंचार विभाग
‘प्रत्येक सिममध्ये महिला हेल्पलाइन’
By admin | Updated: July 2, 2016 02:49 IST