शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

महिलांनी तोकड्या कपड्यात उत्तेजक नाचणे ‘अश्लील’ नाही; मुंबई हायकोर्टाने केले स्पष्ट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2023 14:48 IST

प्रेक्षक या महिलांवर डमी चलनी नोटांचा वर्षाव करत होते.

डॉ. खुशालचंद बाहेती

मुंबई : कमी कपड्यांमध्ये प्रक्षोभकपणे नाचणाऱ्या किंवा हातवारे करणाऱ्या स्त्रिया हे असे ‘अश्लील’ किंवा ‘अनैतिक’ कृत्य करत नाहीत की, ज्यामुळे एखाद्याला त्रास होईल, असे मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

३० मे २०२३ रोजी टायगर पॅराडाइज रिसॉर्ट आणि वॉटर पार्क, तिरखुरा (जि. नागपूर) येथे पोलिसांनी छापा टाकला. शॉर्ट स्कर्ट आणि कमी कपडे घातलेल्या सहा महिला अश्लील नृत्य करत होत्या. प्रेक्षक या महिलांवर डमी चलनी नोटांचा वर्षाव करत होते.

पोलिसांनी प्रेक्षक आणि महिलांविरोधात एफआयआर दाखल केला. एफआयआरला हायकोर्टात आव्हान देण्यात आले. आयपीसीचे कलम २९४ चा गुन्हा घडलेला नाही. नाचण्याचा कार्यक्रम सार्वजनिक ठिकाणी नव्हता. तो विशिष्ट ग्राहकांसाठी राखीव असलेल्या बँक्वेट हॉलमध्ये होते. त्यामुळे कोणालाही त्रास झाला नाही. केवळ एका पोलिस अधिकाऱ्याला ते अश्लील वाटले म्हणून तो गुन्हा ठरत नाही, असा युक्तिवाद करण्यात आला.

ज्या हॉलमध्ये नृत्य सादर करण्यात आले ते सार्वजनिक ठिकाण ठरते; परंतु नृत्य अश्लील किंवा कोणाला त्रास देणारे नव्हते, असे निरीक्षण नोंदवत हायकोर्टाने एफआयआर रद्द केला.

लहान स्कर्ट घातलेल्या महिला नृत्यांगनाचे उत्तेजक रीतीने नाचणे किंवा त्यांचे हातवारे करणे याला पोलिस अधिकारी अश्लील मानतात. यामुळे जनतेला त्रास होऊ शकतो मानतात, म्हणून याला अश्लील म्हणता येणार नाही.

-   भारतीय समाजात नैतिकतेचे सामान्य नियम प्रचलित आहेत, हे मान्य आहे.-  सध्याच्या काळात स्त्रिया असे कपडे, पोहण्याचा पोशाख किंवा इतर तोकडे पोशाख परिधान करू शकतात हे अगदी सामान्य आणि स्वीकार्य आहे.-   सेन्सार प्रमाणित चित्रपट, सार्वजनिकरीत्या आयोजित सौंदर्य स्पर्धांमध्ये अशा प्रकारच्या पेहरावाचे आपण अनेकदा साक्षीदार असतो, हे पाहून प्रेक्षकांना चीड येत नाही.-न्यायमूर्ती विनय जोशी आणि वाल्मीकी मिनेझिस(मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठ)

टॅग्स :Courtन्यायालयdanceनृत्यWomenमहिला