शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

मशिदींमध्ये महिलाही नमाज अदा करु शकतात, मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाची न्यायालयाला माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2023 10:03 IST

पुण्यातील एका वकिलाने मुस्लिम महिलांना मशिदीत प्रवेशबंदी बेकायदेशीर घोषित करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. हे मुस्लिम महिलांच्या घटनात्मक अधिकारांचे उल्लंघन आहे. अशा प्रकारच्या निर्बंधाची कल्पना कुराणमध्येदेखील केली गेली नव्हती, असा युक्तिवाद यात केला आहे. 

डॉ. खुशालचंद बाहेती -मुंबई : इस्लाममध्येमहिलांना नमाज किंवा सामूहिक नमाज अदा करण्यासाठी मशिदींमध्ये प्रवेश करण्यास मनाई नाही. परंतु  स्त्री-पुरुष  एकत्र येत नमाज अदा करू शकत  नाहीत, अशी माहिती ऑल-इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने (एआयएमपीएलबी) सर्वोच्च न्यायालयाला प्रतिज्ञापत्राद्वारे दिली आहे. मुस्लिम वैयक्तिक कायदा किंवा शरियतच्या संरक्षणासाठी सरकारांशी संपर्क साधणारी एआयएमपीएलबी ही एक  संस्था आहे. 

कुणाची याचिका -पुण्यातील एका वकिलाने मुस्लिम महिलांना मशिदीत प्रवेशबंदी बेकायदेशीर घोषित करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. हे मुस्लिम महिलांच्या घटनात्मक अधिकारांचे उल्लंघन आहे. अशा प्रकारच्या निर्बंधाची कल्पना कुराणमध्येदेखील केली गेली नव्हती, असा युक्तिवाद यात केला आहे. 

एआयएमपीएलबीने आपली भूमिका स्पष्ट केली की, मुस्लिम महिलांना मशिदीत प्रवेश करण्यास व नमाज किंवा सामूहिक प्रार्थना करण्यास मनाई नाही. तथापि, समान ओळीत किंवा समान जागेत स्त्री-पुरुषांचे मुक्त मिश्रण इस्लामशी सुसंगत नाही.

प्रतिज्ञापत्रातील मुद्दे -- मुस्लिम महिलांना नमाज अदा करण्यासाठी मशिदीत जाण्यास मनाई नाही.

- मुस्लिम महिलांना इस्लामिक कायद्यानुसार दिवसातून पाच वेळा नमाज अदा करणे बंधनकारक नाही. 

- मुस्लिम महिलांनी शुक्रवारच्या दिवशी साप्ताहिक नमाज अदा करावी, असा कोणताही धार्मिक आदेश नाही.

- मुस्लिम स्त्रीला वेगळे स्थान दिले जाते. कारण इस्लामच्या सिद्धांतानुसार तिने घरी किंवा मशिदीत नमाज अदा केली तरी समान धार्मिक बक्षीस, म्हणजे सवाबची पात्र आहे. 

- इस्लामनुसार मशिदींमध्ये स्त्री-पुरुष एकत्र येण्याची परवानगी नाही.. मक्केत एकत्र केले जाणारे विधी नियमित प्रार्थनेपेक्षा वेगळे आहेत.

 

टॅग्स :WomenमहिलाMuslimमुस्लीमIslamइस्लामCourtन्यायालय