शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

बँकेतून पैसे मिळत नसल्याच्या विवंचनेतून महिलेची आत्महत्या

By admin | Updated: January 5, 2017 21:39 IST

कलमाडी, ता.नंदुरबार येथील महिलेने मुलाच्या लग्नासाठी बडोदा बँकेच्या खात्यातून पैसे मिळत नसल्याच्या नैराश्येतून आत्महत्या केल्याची घटना आज पहाटे घडली.

ऑनलाइन लोकमतनंदुरबार, दि. 5 - कलमाडी, ता.नंदुरबार येथील महिलेने मुलाच्या लग्नासाठी बडोदा बँकेच्या खात्यातून पैसे मिळत नसल्याच्या नैराश्येतून आत्महत्या केल्याची घटना आज पहाटे घडली. दरम्यान, बडोदा बँकेच्या व्यवस्थापकांनी या आरोपाचे खंडन केले आहे. तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.कलमाडी येथील मालुबाई मोतिलाल पाटील (५५) या महिलेने गावालगतच्या विहिरीत उडी घेवून आत्महत्या केली. सकाळी ही बाब निदर्शनास आली. मालुबाई पाटील यांच्या मोठ्या मुलाचे लग्न ठरले होते. त्यासाठी पाटील कुटुंबाला पैशांची अडचण होती. मोतिलाल पाटील यांचे बडोदा बँकेच्या नंदुरबार शाखेत बचत खाते आहे. त्या खात्यातून पैसे मिळत नसल्यामुळे आत्महत्या केल्याचा आरोप नातेवाईकांनी केली. जिल्हा रुग्णालयात देखील नातेवाईकांनी संताप व्यक्त केला. जिल्हाधिकारी कार्यालयात मृतदेह नेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यावेळी पोलीस उपअधीक्षक शिवाजी गावीत, स्थानिक गुन्हा अन्वेशन शाखेचे निरीक्षक गिरीश पाटील, शहरचे वाघमारे यांनी नातेवाईकांची समजूत घातली. त्यानंतर पाच जणांचे शिष्टमंडळ जिल्हाधिकाऱ्यांकडे गेले. तेथे कैफियत मांडण्यात आली. जिल्हाधिकारी डॉ.एम.कलशेट्टी यांनी नातेवाईकांची समजूत घातली. पालकमंत्री जयकुमार रावल यांच्याशीही बोलणे करून दिले. रावल यांनी संबधितांवर कारवाईचे आश्वासन दिले. तसेच मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत मिळून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. नातेवाईकांचे समाधान झाल्यानंतर सायंकाळी उशीरा मालुबाई यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.याबाबत भूता पुंडलि्क पाटील यांनी तालुका पोलिसात खबर दिल्याने नोंद करण्यात आली आहे.