शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकमध्ये महिलेचे अपहरण; देहविक्रयसाठी मुंबईला विक्री

By admin | Updated: February 22, 2017 21:02 IST

प्रेमविवाह केलेल्या बांगलादेशी पत्नीचे सिन्नर येथील वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांनी दहा दिवसांपूर्वी अपहरण

 

नाशिक : प्रेमविवाह केलेल्या बांगलादेशी पत्नीचे सिन्नर येथील वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांनी दहा दिवसांपूर्वी अपहरण करून तिची मुंबईला वेश्या व्यवसायासाठी विक्री केल्याची तक्रार विवाहितेच्या पतीने पोलीस आयुक्त डॉ़ रवींद्रकुमार सिंगल यांच्याकडे केली असून, पत्नीची वेश्या व्यवसायातून सुटका करण्याची विनंती केली आहे़ या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे़पोलीस आयुक्तांकडे करण्यात आलेल्या तक्रारीनुसार भद्रकाली परिसरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या एका बांगलादेशी महिलेची वडाळागावातील एका तरुणाशी ओळख झाली़ या ओळखीतून ती महिला त्यास बांगलादेशला घेऊन गेली़ तिथे त्याचा परिचय भावना (नाव बदलले आहे) नावाच्या मुलीशी झाला व ते दोघेही नाशिकला आले व त्यांनी प्रेमविवाह केला़ यानंतर गत सहा महिन्यांपासून हे वडाळागावात राहात होते़

सिन्नर येथील वेश्या व्यवसायाशी संबंधित एक महिला व तिची मावशी हे पाथर्डी फाटा येथील भावनाच्या घरी आले़ या दोघींनी एक दिवस मुक्काम करून भावनाचा पती कामावर गेल्याची संधी साधून तिला बळजबरीने सोबत घेऊन गेले़ तसेच जातांना भावना व तिच्या पतीच्या विवाहाची कागदपत्रे, आधार कार्डही सोबत घेऊन गेले़ याचदिवशी भावनाने पतीला कसाबसा फोन करून मला मुंबईला वेश्या व्यवसायासाठी आणण्यात आले असून मला वाचवा, असे सांगितले़

यानंतर भावनाचा पती सिन्नरला वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलेकडे गेला असता त्यास मारहाण करून त्याची दुचाकीही काढून घेण्यात आली़ तसेच दलालीच्या केसमध्ये अडकविण्याची धमकी देऊन भावनाची मुंबईला विक्री करण्यात आल्याचे सांगितले़ यानंतर भावनाच्या पतीने इंदिरानगर पोलीस ठाणे गाठून तक्रार केली, मात्र पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली नाही़ त्यामुळे नाईलाज झालेल्या भावनाच्या पतीने पोलीस आयुक्त डॉ़ रवींद्र सिंगल यांच्याकडे तक्रार केली आहे़