शहरं
Join us  
Trending Stories
1
मल्लिकार्जुन खर्गे यांच्या RSS वर बंदी घालण्याच्या मागणीवर अमित शाह यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
2
एक काेटी वाहनांना नाही ‘हाय सिक्युरिटी नंबरप्लेट’! एकूण ६८.२४ लाख चालकांनी दिला प्रतिसाद
3
कसली थंडी..? आता अनुभवा ‘नोव्हेंबर हीट’! मुंबईसह राज्यभरात अवकाळी पावसाचीही शक्यता
4
दुलारचंद यादव हत्याकांड: नाट्यमय घडामोडींनंतर अनंत सिंह यांना अटक, रात्री पोहोचले पोलीस, त्यानंतर...
5
आजचे राशीभविष्य, ०२ नोव्हेंबर २०२५: हाती पैसा, यश-कीर्ती लाभेल; पण हट्टीपणा सोडावा
6
महिला वर्ल्डकप: आज घडणार इतिहास; प्रथमच जिंकेल भारत किंवा दक्षिण आफ्रिका; उत्सुकता शिगेला
7
कुष्ठरोगाचे निदान झाले रे झाले की, रुग्णनाेंद बंधनकारक; सार्वजनिक आरोग्य विभागाचा निर्णय
8
आयोगाचा सर्व्हर कुणाच्या कार्यालयात? कुणाची नावे काढायची, कुठली टाकायची हा कट सुरू: ठाकरे
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभच लाभ, पद-पैसा वाढ; ६ राशींना काहीसा ताप, तुमची रास कोणती?
10
चार हजार ग्राहकांनी वाढवली २२ मेगावॅट क्षमता; २ हजार ४६० औद्योगिक ग्राहकांचाही समावेश
11
मूक आंदोलन करून भाजपने केला पलटवार! ...हा तर मविआचा नवा कट- रवींद्र चव्हाण
12
जय हरी विठ्ठल.. एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक केली विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
13
दुबार मतदार दिसताच बडवा; मविआ-मनसेचा महाएल्गार! मतदार यादीतील घोळाबाबत मुंबईत निषेध मोर्चा
14
गाव पोटा.. व्यवसाय शेती अन् वालेगावकर दाम्पत्याला मिळाला उपमुख्यमंत्र्यांसोबत महापूजेचा मान
15
‘तुमच्या विमानात आज १९८४ मद्रास स्टाईल बॉम्ब अटॅक होणार आहे’; मुंबईत इमर्जन्सी लँडिंग
16
२४ मोबाईल खेचणाऱ्या दोन आरोपींना अटक; आचोळेच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांची कामगिरी
17
ठेकेदारांचे कामबंद, हिवाळी अधिवेशन नागपूर की मुंबईत? बांधकाम खाते संभ्रमात
18
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
19
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
20
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी

जमीन बळकावण्याचा विरोध केल्याने महिलेला मारहाण

By admin | Updated: January 30, 2017 17:26 IST

इंदापूर तालुक्यात खासगी सावकारीने उच्छाद मांडला आहे.

ऑनलाइन लोकमतइंदापूर, दि. 30 - इंदापूर तालुक्यात खासगी सावकारीने उच्छाद मांडला आहे. प्रजासत्ताकदिनीच सावकारीतून जमीन बळकावण्याचा प्रयत्न करणारास विरोध करणाऱ्या महिलेचे अंगावरील कपडे फाडून तिला मारहाण केल्याची घटना बळपुडी (ता. इंदापूर ) येथे घडली. या प्रकरणी एका महिलेसह दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे.महादेव शंकर देवकाते, सदाशिव शंकर देवकाते, अमोल महादेव देवकाते, छबाबाई महादेव देवकाते (सर्व रा. बळपुडी) अशी आरोपींची नावे आहेत. मारहाण झालेल्या महिलेने त्यांच्या विरुध्द इंदापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. इंदापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी जनावरांना गवत आणण्याकरिता बळपुडी येथील गट नं. ५६ मधील तिच्या मालकीच्या शेतामध्ये गेली होती. तेथे आरोपी महादेव शंकर देवकाते, सदाशिव शंकर देवकाते, अमोल महादेव देवकाते, छबाबाई महादेव देवकाते हे फिर्यादीच्या शेताची मोजणी करून पाईपलाईनकरिता चारीचे खोदकाम करीत होते. त्यावेळी माझ्या शेतात येऊ नका. चारीचे खोदकाम करू नका, असे फिर्यादीने म्हणताच महादेव शंकर देवकाते म्हणाला की, माझे व्याजाने घेतलेले तीन लाख रुपये दे. अथवा कोर्टातील दावा माझ्या सांगण्याप्रमाणे करून दे, असे म्हणतच चारीच्या खोदकामास विरोध केल्याने चिडून आरोपींनी फिर्यादीस दगडाने हातातील लाकडी दांडक्याने पायावर, डोक्यावर, दोन्ही हातांवर मारले. शिवीगाळ, दमदाटी केली. जिवे मारण्याची धमकी दिली. या मारहाणीमध्ये फिर्यादीच्या अंगावरील कपडे फाडले. गळ्यातील सोन्याचे एक तोळ्याचे मंगळसूत्र तुटून गहाळ झाले, असे फिर्यादीत म्हटले आहे. सध्या फिर्यादीवर उपजिल्हा रुग्णालयात औषधोपचार सुरू आहेत. हवालदार शंकरराव वाघमारे प्रकरणाचा तपास करीत आहेत.