शहरं
Join us  
Trending Stories
1
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
2
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
3
जॅकपॉट अन् खजिना...! महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात सापडले सोने, लिथिअम आयनचे साठे; खोऱ्याने पैसा ओढणार...
4
चोरी केल्यानंतर ते शिर्डी गाठायचे, साईबाबांच्या चरणी 'दान' ठेवायचे! काळाचौकी पोलिसांची २४ तासांत कारवाई; दोन तरुण चोर जेरबंद
5
वर्सोवा-भाईंदर कोस्टल प्रकल्पासाठी ४५ हजार खारफुटी तोडणार; हायकोर्टाचा हिरवा झेंडा
6
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
7
पतीकडूनच सर्पदंश करवून पत्नीची हत्या, ब्रेन हॅमरेजने मृत्यू झाल्याचा बनाव; तिघांना अटक
8
मुंबईच्या फनेल झोनमधील इमारतींच्या पुनर्विकासासाठी 'हाउसिंग फॉर ऑल' योजना
9
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
10
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
11
सर्व्हेसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर जमावाकडून दगड आणि धनुष्यबाणांद्वारे हल्ला, ४७ जण जखमी   
12
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
13
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
14
आश्रम हल्ला प्रकरणातील एकमेव आरोपीची तब्बल ३४ वर्षांनंतर सुटका; काय होते नेमके प्रकरण?
15
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
16
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
17
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
18
चार्टर्ड प्लेनमधील 'त्या' प्रवासामुळे भाजपच्या नेत्यांना वरिष्ठांचे फटके!
19
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
20
निधीटंचाई; शेततळ्यांना सरकारनेच दिली कबुली; कृषिमंत्र्यांनी दिली माहिती : रक्कम देताना हात आखडता
Daily Top 2Weekly Top 5

प्रचारासाठी उरले फक्त चार दिवस, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सह उद्यापासून  नाशिक मध्ये नेत्यांच्या सभांचा धडाका

By संजय पाठक | Updated: May 14, 2024 09:54 IST

नाशिक - लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात 11 जागांवर 20 मे रोजी मतदान होणार असून  त्यात नाशिक , दिंडोरी आणि ...

नाशिक- लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात 11 जागांवर 20 मे रोजी मतदान होणार असून  त्यात नाशिक, दिंडोरी आणि धुळे या उत्तर महाराष्ट्रातील तीन जागांचा समावेश आहे.  प्रचारासाठी अवघे चार दिवस उरल्याने उद्या म्हणजेच 15 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह विविध पक्षांच्या नेत्यांच्या सभा नाशिक मध्ये होणार आहेत.

 उद्या दुपारी एक वाजता निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे तर सायंकाळी सहा वाजता हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेता उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार हे 15 आणि 16 मे असे दोन दिवस नाशिक आणि दिंडोरी येथे प्रचार सभा घेणार आहेत. याशिवाय  गटाचे नेते जयंत पाटील तसेच राष्ट्रवादी च्या अजित पवार गटाचे नेते राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ हे देखील मतदारसंघांमध्ये बैठका घेणार आहेत. जळगाव येथील मतदान पार पडल्याने भाजपाचे नेते गिरीश महाजन तसेच नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे हे देखील पुढील आठ दिवस नाशिक मध्ये तळ ठोकून बसणार आहेत

नाशिकमध्ये महायुतीच्या प्रचारासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार पंकजा मुंडे यांच्या सभांचे नियोजन करण्यात आले आहे तर महाविकास आघाडीच्या प्रचारासाठी खासदार अमोल कोल्हे, आमदार रोहित पवार,  काँग्रेसचे पदाधिकारी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, खासदार इम्रान प्रताप गडी यांच्या सभांचे नियोजन केले जात आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीNashikनाशिकnashik-pcनाशिक