मुंबई : नागपूर येथील हिवाळी अधिवेशनापूर्वी कोळीवाड्यांच्या पुनर्विकासाचे धोरण निश्चित केले जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधानसभेत केली.प्रताप सरनाईक यांनी याबाबतची लक्षवेधी सूचना दाखल केली होती. २०१५ पर्यंतच्या झोपड्या नियमित करण्याची मागणी सरनाईक यांनी केली. त्यावर २००० सालापर्यंतच्या झोपड्या नियमित करण्यास न्यायालयाने मान्यता दिली असल्याकडे फडणवीस यांनी लक्ष वेधले. आशिष शेलार यांनी कोळीवाडे व गावठाणे येथील बांधकामे सीआरझेडमुळे विकसीत करता येत नाही, याकडे लक्ष वेधले असता फडणवीस यांनी नवीन विकास नियंत्रण नियमावलीत ठाणे व उपनगरात क्लस्टर डेव्हलपमेंट राबवण्याकरिता आणखी काही सवलती देण्याचीही घोषणा केली.
हिवाळी अधिवेशनापूर्वी कोळीवाड्यांच्या विकासाचा निर्णय
By admin | Updated: August 1, 2015 01:22 IST