शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
3
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
4
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
5
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
6
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
7
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
8
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
9
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
10
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
11
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
12
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
13
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
14
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
15
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
16
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
17
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
18
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
19
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
20
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे

महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अ‍वॉर्डचे विजेते

By admin | Published: January 31, 2017 9:44 PM

मराठी, हिंदी चित्रपटसृष्टी तसेच टीव्ही जगतातील कलाकार, फॅशन आणि उद्योगजगतातील मान्यवरांना हा पुरस्कार देऊन गौरवण्यात येत आहे

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 31 - लोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टाइलिश अ‍वॉर्डचे आयोजन लोकमतच्या वतीने करण्यात आले आहे. मराठी, हिंदी चित्रपटसृष्टी तसेच टीव्हीजगतातील कलाकार, फॅशन आणि उद्योगजगतातील मान्यवरांना हा पुरस्कार देऊन गौरवण्यात येत आहे. स्टाईल आणि स्टायलिश व्यक्तिमत्त्व याला उभारी मिळवून देणारा या एका आगळावेगळ्या आणि अभिनव सन्मान सोहळ्याची सुरुवात स्टायलिश पद्धतीने झाली आहे. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच फुलवा खामकर आणि ग्रुपने गणेश वंदनेने धमाकेदार स्टार्ट केला.शिवसेनेच्या युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी संवाद साधताना म्हटले की, मी जे चांगले दिसते आणि जे समोर येते ते परिधान करणे पसंत करतो. मला वाटते की, स्वभावातून व्यक्तीची स्टाईल दिसावी. परंतु अशा आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाला येऊन खूप छान वाटतेय. माझ्यासाठी माझे आजोबा बाळासाहेब ठाकरे स्टाईल आयकॉन आहेत. मग ती त्यांची बोलण्याची स्टाईल असो वा काम करण्याची, त्यांची स्टाईल वेगळी होती.

लोकमत समूहाच्या एडिटोरीयल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा यांनी उपस्थित पाहुणे आणि सत्कारमूर्तींचे स्वागत केले. कार्यक्रमाला संबोधित करताना त्यांनी या सोहळ्याच्या संकल्पनेमागची नेमकी भूमिका स्पष्ट केली. उपस्थित असलेल्या अनेक मान्यवरांचा त्यांनी शब्दसुमनांनी गौरव केला. तसेच त्यांनी शेतकऱ्यासाठी नागपुरात वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल आयोजित करण्याची घोषणा केली.स्टाईल काय असते हे स्पष्ट करताना ते म्हणाले की, स्टाईल केवळ कपड्यात नसते ती व्यक्तीच्या कर्तृत्वात असते. त्या अर्थाने विविध क्षेत्रात छाप पाडणारे सर्व मान्यवर स्टायलिश आहेत.महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अ‍ॅवॉर्डचे विजेते -

 महेश कोठारे

प्रसिद्ध दिग्दर्शक, अभिनेता अशी ओळख निर्माण करत रसिकांचे फेव्हरेट बनलेले व्यक्तीमत्त्व म्हणजे महेश कोठारे. मराठीमध्ये धुमधडाका, दे दणादण, थरथराट, धडाकेबाज, पछाडलेला, माझा छकुला अशा एकाहून एक सरस सिनेमा देणारे महेश कोठारे. आपल्या अभिनयासोबतच दिग्दर्शनाने त्यांनी चित्रपटसृष्टीत एक नवी उंची गाठली आहे. आजही त्यांचा उत्साह आणि कामाचा आवाका तरुणांनाही लाजवेल असाच असतो. त्यांच्या याच असामान्य कर्तृत्वाची दखल घेत या पुरस्कार सोहळ्यात महेश कोठारे यांना लाइफटाइम अचिव्हमेंट अवॉर्डने गौरवण्यात आले. लोकमत समुहाचे चेअरमन विजय दर्डा यांच्या हस्ते महेश कोठारे यांना हा पुस्कार प्रदान करताच उपस्थितांनी उभे राहून त्यांना अभिवादन केले.आणि मनोरंजन, राजकीय, व्यवसायिक क्षेत्रातील विविध फॅशनेबल व स्टायलिश मान्यवरांच्या उपस्थित कार्यक्रामाची सांगता झाला. यापूर्वी कधीही न झालेला कार्यक्रम असाच ह्यलोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्डचे वर्णन करावे लागेल.
 
मोस्ट स्टायलिश ब्युरोक्रॅट म्हणून संजय सेठी यांचा लोकमतचे इडिटर-इन-चीप राजेंद्र दर्डा, समुह संपादक दिनकर रायकर, करूण गेरा यांनी सन्मान केला.​
 
शाल्मली खोलगडे
इश्कजादे या सिनेमातील मैं परेशान परेशान... या गाण्यामुळे रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवणारी मराठमोळी गायिका म्हणजे शाल्मली खोलगडे. पदार्पणातच सर्वोत्कृष्ट गायिका या कॅटेगिरीत फिल्मफेअर अवॉर्ड मिळवणारी शाल्मली तिच्या स्टाइलमुळेही नेहमीच चर्चेत असते. आपल्या सूरांनी शाल्मलीने रसिकांवर मोहिनी घातली आहे. शाल्मलीच्या या लोकप्रियतेचा गौरव करण्यासाठी तिला मोस्ट स्टायलिश गायिका या अवॉर्डने गौरवण्यात आले. संजय सेठी, विजय दर्डा यांच्या हस्ते शाल्मलीला हा पुरस्कार देण्यात आला.
 
अतुल कसबेकर
आपल्या लेन्सच्या नजरेतून दिग्गजांच्या छबी कॅमेऱ्यात कैद करणारा प्रसिद्ध आणि स्टायलिश छायाचित्रकार म्हणजे अतुल कसबेकर. अतुलने आजवर अनेक बड्या स्टार्सना वेगळी ओळख देऊन नवा ट्रेंड सेट केला आहे. त्यामुळेच त्यांच्या या अतुलनीय कार्याची दखल या पुरस्कार सोहळ्यात घेतली गेली आहे. त्याला महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश ट्रेंडसेटर हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. सखी मंचच्या संस्थापक अध्यक्ष आशू दर्डा, जितेंद्र आणि नितीन सरदेसाई यांनी अतुलला हा पुरस्कार प्रदान केला.
 
सोनम कपूर
इंडस्ट्रीमध्ये ज्या मोजक्या अ‍ॅक्ट्रेस त्यांच्या हटके स्टाइलसाठी ओळखल्या जातात, त्यातील एक नाव म्हणजे सोनम कपूर होय. सोनमचा हाच स्टाइल सेन्स हेरून तिला मोस्ट स्टायलिश अभिनेत्री या अवॉर्डने सन्मानित करण्यात आले. लोकमतचे कार्यकारी संचालक करण दर्डा आणि ऋषी कपूर यांच्या हस्ते हा पुरस्कार देऊन सोनमचा गौरव करण्यात आला.
साजिद नाडियाडवाला
साजिद नाडियाडवाला यांना त्यांच्या विशिष्ट सिनेमांसाठी ओळखले जाते. सद्यस्थितीत त्यांचे इंडस्ट्रीमधील स्थान महत्त्वपुर्ण असून, फॅन्सनाही नेहमीच त्यांच्या सिनेमाची आतुरता असते. अशा या मोस्ट स्टायलिश निर्माता आणि दिग्दर्शकाला सोहळ्यात महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश फिल्ममेकर हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. साजिद नाडियाडवाला यांना हा पुरस्कार प्रताप दिगावकर आणि सज्जन जिंदाल यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
 
सोनाली बेद्रे
बॉलीवुडमध्ये सोनालीने विविध प्रकारच्या भूमिका साकारत आपले वेगळे स्थान निर्माण केले. छम छम करता हैं... या अगं बाई अरेच्चा सिनेमातील गाण्यावर थिरकत सोनालीने रसिकांना आश्चयार्चा सुखद धक्का दिला. सोनालीच्या अभिनयासोबतच तिचा डान्स आणि स्टाइलसुद्धा रसिकांवर जादू करुन गेली आहे. त्यामुळेच सोनालीला या पुरस्कार सोहळ्यात मोस्ट स्टायलिश आयकॉन या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. उषा काकडे यांनी सोनालीचा हा पुरस्कार देऊन सन्मान केला.
आशुतोष गोवारीकर
बॉलिवूडला ऑस्करपर्यंत नेणारे आणि वैविध्यपूर्ण विषय घेऊन सिनेमा बनवणारे दिग्दर्शक म्हणजे आशुतोष गोवारीकर. त्यांच्या लगान या सिनेमाने ऑस्करपर्यंत झेप घेत नवा इतिहास निर्माण केला होता. त्यानंतर स्वदेस, जोधा अकबर, मोहनजोदारो असे दजेर्दार सिनेमांची आशुतोष गोवारीकर यांनी निर्मिती केली आहे. त्यांच्या याच कर्तृत्वाचा गौरव करण्यासाठी त्यांना महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश फिल्ममेकरह्ण हा अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आशुतोष गोवारीकर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. ​यावेळी राकेश रोशन आणि लोकमत समुहाचे चेअरमन विजय दर्डा उपस्थित होते.
 
टायगर श्रॉफ
डान्स, बॉडी, अ‍ॅक्टिंग आणि स्टाइल असे सर्वगुण असलेला अभिनेता टायगर श्रॉफ हा अल्पावधितच तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनला आहे. खरं तर टायगर सध्या यंग जनरेशनसाठी स्टाइल आयकॉन ठरत आहे. टायगर श्रॉफच्या या स्टाइलचा गौरव करण्यासाठी त्याला लोकमतने मोस्ट स्टायलीश अभिनेता या अवॉर्डने गौरविले आहे. टायगरला हा पुरस्कार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि देवेंद्र दर्डा हस्ते प्रदान करण्यात आला.
हृतिक रोशन
आपल्या हटके डान्स शैलीने तरुणांचे मने जिंकणारा अभिनेता तिक रोशन हा त्याच्या स्टाइलसाठीही ओळखला जातो. नेहमीच काही तरी हटके स्टाइल करून चर्चेत राहणारा हृतिकची एक झलक त्याच्या फॅन्ससाठी पर्वणीच ठरत असते. नुकताच रिलिज झालेल्या त्याच्या काबील या सिनेमातील त्याची स्टाइल हल्ली तरुणार्इंमध्ये फॉलो केली जात आहे. त्याच्या याच लोकप्रियतेमुळे या पुरस्कार सोहळ्यात हृतिकला महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश सुपरस्टार हा मानाचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, लोकमत समुहाचे चेअरमन विजय दर्डा यांच्या हस्ते हृतिकचा यावेळी गौरव करण्यात आला.
 
गौतम सिंघानिया
रेमंड समूहाचे एमडी आणि चेअरमन तसेच उद्योग विश्वातील एक प्रसिद्ध नाव म्हणजे गौतम सिंघानिया. उद्योगविश्वात दिलेल्या योगदानासाठी गौतम सिंघानिया यांना या पुरस्कार सोहळ्यात ह्यमोस्ट स्टायलिश इंडस्ट्रियालिस्ट या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. गौतम सिंघानिया यांना हा पुरस्कार राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगुंटीवार यांच्या हस्ते देऊन गौरवण्यात आले. यावेळी ​बिट्टा सिंग उपस्थित होते.
 
सज्जन जिंदाल आणि संगीता जिंदाल 
भारतीय उद्योग समूहातील एक आघाडीचे नाव म्हणजे जेएसडब्ल्यू समूहाचे चेअरमन सज्जन जिंदाल. स्टील, खाणकाम, वीज अशा विविध क्षेत्रात उद्योगाचा गाडा समर्थपणे चालवणारे उद्योगपती सज्जन जिंदाल यांची अनोखी स्टाइलही तेवढीच वैशिष्ट्यपूर्ण आहे. कोणत्याही पुरुषाच्या यशामागे स्त्रीचा हात असतो असे म्हणतात. त्यानुसारच सज्जन यांच्या यशात त्यांची पत्नी संगीता जिंदाल यांचाही सिंहाचा वाटा आहे. त्यामुळेच या जोडीला या पुरस्कार सोहळ्यात महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश पॉवर कपल या मानाच्या पुरस्काराने गौरवण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि लोकमत समुहाचे चेअरमन विजय दर्डा यांच्या हस्ते हा पुरस्कार सज्जन आणि संगीता जिंदाल यांना प्रदान करण्यात आला.
 
अमृता फडणवीस
मोस्ट स्टायलिश पॉवर वुमन म्हणून पत्नी अमृता फडणवीस यांना सन्मानित करण्यात आले. परंतु त्या उपस्थित न राहू शकल्यामुळे त्यांच्यातर्फे देवेंद फडणवीस यांनी हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी हृतिक रोशन, राकेश रोशन, कौशिक मराठे स्टेजवर उपस्थित होते.
 
स्वप्निल जोशी
छोट्या पडद्यावर श्रीकृष्णाची भूमिका साकारत घराघरात पोहचलेला आणि आजच्या तरुणाईचा मराठमोळा लाडका अभिनेता म्हणजे स्वप्नील जोशी. आपल्या विविधरंगी भूमिका आणि अनोख्या स्टाइलने स्वप्नीलने तरुणाच्या मनात अढळ स्थान मिळवले आहे. स्वप्नीलच्या याच लोकप्रियतेमुळे तो ह्यमोस्ट स्टायलिश रिडर्स चॉईस या अवॉर्डने सन्मानित करण्यात आले. स्वप्नीलला हा पुरस्कार लोकमतच्या एडिटोरिअल बोर्डाचे अध्यक्ष ऋषी दर्डा यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
 
मिथिला पालकर
कप साँगमुळे अल्पवधीतच वेबविश्वात धुमाकूळ घालणारी मराठमोळं सेन्सेशन म्हणजे मिथिला पालकर. कपच्या तालावरील तिचे ह्यहिची चाल तुरु तुरु... नेटिझन्ससह रसिकांनाही भावले. वेबविश्वासह मिथिलाचे अनेक फॅन्स निर्माण झालेत. त्यामुळेच मिथिलाला या पुरस्कार सोहळ्यात महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश रायसिंग युट्यूब स्टार हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. मिथिलाला हा पुरस्कार अरविंद सेतुरयाल विकी रतनानी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

 

प्रियंका बर्वेआजच्या रंगारंग सायंकाळच्या पहिल्या पुरस्काराचे वितरण झाले असून, गायिका प्रियंका बर्वेला राजकीय नेते अमरसिंग यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला. यावेळी तिने प्यार किया तो डरना क्या हे गाणे सादर करून सर्वांची मने जिंकली.आर जे मलिष्कागुड मॉर्निंग मुंबई हा आवाज रेडिओवरून कानावर पडला की तो निश्चितच आरजे मलिष्काचा असणार हे कुणीही अचूक सांगेल. त्यामुळेच तिच्या लोकप्रिय स्टाईलला सन्मान करताना मोस्ट स्टायलिश आरजे हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. मोस्ट स्टायलिश जॉकी म्हणून मलिष्काने महेश मांजरेकरांच्या हस्ते अवॉर्ड स्वीकारला. ​ 

सोनाली कुलकर्णीमहाराष्ट्राची सो कूल अभिनेत्री सोनाली कुलकर्णीला आदित्य ठाकरे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.

अजिंक्य रहाणे
ज्याला भविष्यातील द वॉल अर्थात राहुल द्रविड म्हणून संबोधले जाते असा टीम इंडियाचा स्टार बॅट्समन म्हणजे मराठमोळा अजिंक्य रहाणे. अल्पावधीत अजिंक्यने आपल्या नावाला सार्थ ठरवत सरस खेळी करून क्रिकेट विश्वात नवी ओळख निर्माण केलीय. बड्या क्रिकेटर्सच्या उपस्थितीतही भारतीय क्रिकेट विश्वात अजिंक्य नावाचा तारा चमकतो आहे. त्यामुळेच त्यांच्या खेळीचे आणि अफलातून फिल्डिंगचे फॅन्सही तितकेच आहे.
 
त्यांच्या याच लोकप्रियतेचा गौरव करण्यासाठी या पुरस्कार सोहळ्यात अजिंक्यला महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश स्पोर्ट्पर्सन या पुरस्काराने गौरवण्यात आले. गौतम सिंघानिया यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करून अजिंक्यचा सन्मान करण्यात आला. मराठीतून भाषण करताना तो म्हणाला, की प्रत्येक पुरस्कार मला प्रोत्साहित करतो. हा स्टाईल अवॉर्डही मला मैदानाबाहेर अधिक स्टायलिश राहण्यास प्रेरित करेल.
 
राधिका आपटे
अल्पवधीतच विविध प्रकारच्या भूमिका साकारून अभिनेत्री राधिका आपटेने बॉलिवूडच नव्हे तर जगभरातील रसिकांची मने जिंकलीत. राधिकाची प्रत्येक अदा जितकी रसिकांना घायाळ करणारी असते. तितकीच तिची स्टाइलही खास असते. राधिकाचे फॅन्स आज जगभर आहेत. राधिकाच्या या लोकप्रियतेमुळे तिला महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश क्रॉसओव्हर आयकॉन हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. राधिकाला हा पुरस्कार सौरभ गाडगीळ आणि गौतम सिंघानिया यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
 
हनुमंत गायकवाड
बीटेक केल्यानंतर टाटा मोटर्ससारखी गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून हनुमंत गायकवाड यांनी साफसफाई आणि देखरेखीचा एक नवा उद्योग सुरू केला. बीवीजी अर्थात भारत विकास ग्रुपच्या माध्यमातून त्यांनी एक नवा समूह सुरू केलाच. त्याचबरोबर या ग्रुपच्या माध्यमातून अनेकांना रोजगार उपलब्ध करून दिला. आजघडीला बीवीजीची वार्षिक उलाढाल जवळपास पाचशे कोटींच्या घरात असून, राष्ट्रपती भवन, संसद भवन परिसर आणि पंतप्रधान निवास अशा अतिमहत्त्वाच्या ठिकाणच्या सफाईची जबाबदारीही या समूहावर आहे. हनुमंत गायकवाड यांच्या याच प्रतिभेची दखल घेत त्यांना या पुरस्कार सोहळ्यात मोस्ट स्टायलिश सोशल एंट्रेप्रन्यूयर अवॉर्डने गौरवण्यात आले. गायकवाड यांना गुलशन ग्रोव्हर आणि प्रवीण परदेशी यांच्या हस्ते हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

अमृता खानविलकरवाजले की बारा म्हणत आपल्या नृत्याने रसिकांची लाडकी बनलेली अभिनेत्री म्हणजे अमृता खानविलकर. आपल्या डान्ससोबतच अभिनय आणि स्टाइलने अमृताने वेगळी ओळख निर्माण केली आहे. अमृताचे फॅन्स तिचा डान्ससोबतच तिच्या अदा आणि स्टाइलवर फिदा असतात. अमृताला मोस्ट स्टायलिश रिडर्स चॉईस या अवॉर्डने गौरविण्यात आले. संजय उपाध्याय यांच्या हस्ते अमृताला हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं.

यावेळी अमृतासाठी एक स्पेशल सरप्राईज होते. सई ताम्हणकर आणि महेश मांजरेकर यांना स्टेजवर बोलावण्यात आले. यावेळी मांजरेकरांनी सई आणि अमृताला स्टाईलविषयी प्रश्न विचारले. ​सई ताम्हणकर म्हणते, सोनम कपूर माझी फॅशन आयकॉन आहे. अमृताही खूप स्टायलिश आहे.