शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

शूटिंग परवानग्यांसाठी एक खिडकी योजना- मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2019 04:09 IST

१५ ऑगस्टला उद्घाटन, रोजगार मिळण्यास चालना

मुंबई : चित्रपट, मालिका, वेब सीरीज अशा माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत. चित्रपटासह विविध चित्रीकरणांसाठी लागणाऱ्या सर्व प्रकारच्या परवान्यांसाठी एक खिडकी योजना तयार करण्यात येणार आहे. येत्या १५ आॅगस्ट रोजी या एक खिडकी योजनेच्या डिजिटल प्लॅटफॉर्मचे उद्घाटन करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरूवारी विधान परिषदेत दिली.मीरा रोड येथे वेबसीरीजचे शूटिंग सुरू असताना दिग्दर्शक, कलाकारांना मारहाण झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य किरण पावसकर यांनी या मारहाणीचा मुद्दा उपस्थित केला. यावर उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की, मीरा भाईंदर आणि वसई विरार पट्टयात काही गट झाले आहे. आपल्याच माध्यमातून चित्रीकरण व्हावे, असा त्यांचा हट्ट असतो. त्यांच्यातील वादातून हा हल्ला झाला आहे. या प्रकरणात तीन आरोपींना अटक झाली आहे. आरोपींची आधीची गुन्हेगारी पार्श्वभूमी असेल तर मोक्का लावण्याचा विचार करण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. या घटनेबाबत ठाणे पोलीस आयुक्त आणि आयजी कोकण हे निर्मात्यांसोबत बैठक घेतील. सर्व परवानग्या घेतल्या असतील तर शूटिंग दरम्यान पोलीस संरक्षण देऊ. या प्रकरणी संबंधित पोलिस अधिकाऱ्यांनी दिरंगाई केल्याची तक्रार आहे. याचीही नोंद घेण्याची सुचना आयुक्तांना दिल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.सध्या फिल्म इंडस्ट्रीत मोठ्या प्रमाणात निर्मितीचे काम सुरू आहे. या व्यवसायातून छोट्या मोठ्या विविध प्रकारचे रोजगार निर्माण झाले आहेत. त्यामुळे चित्रीकरणासाठी आवश्यक सर्व परवानग्या आॅनलाईन देण्यासाठी या योजनेच्या डीजिटल प्लाटफॉर्मचे उद्घाटन करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.४० विद्यापीठे बोगसराज्यात ४० विद्यापीठे बोगस असल्याची कबुली उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिली. उच्च व तंत्रशिक्षण विभागाला फेब्रुवारीत ही विद्यापीठे बोगस असल्याचे आढळले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस