शहरं
Join us  
Trending Stories
1
अयोध्येमध्ये सिलेंडरचा भीषण स्फोट, घर कोसळून ५ जणा्ंचा  मृत्यू, अनेक जण अडकल्याची भीती  
2
ओवेसींच्या सभेतून वारिस पठाण यांचं नितेश राणेंना आव्हान, म्हणाले, ‘दोन पायांवर येशील, पण…’ 
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या गळ्यात शांततेचं नोबेल, नेतन्याहू यांनी शेअर केला असा फोटो, म्हणाले…
4
"सामाजिक विषमता निर्माण करण्याला शरद पवार जबाबदार', मनोज जरांगेंच्या भेटीनंतर राधाकृष्ण विखेंचा आरोप 
5
आठव्या क्रमांकाच्या बॅटरनं वाचवलं; पण तोच डाव उलटा फिरला!.. अन् टीम इंडियासमोर आफ्रिकेनं मारली बाजी
6
'हो, ते प्रवासी विमान आम्ही पाडलं होतं', अनेक महिन्यांनंतर व्लादिमीर पुतीन यांची कबुली
7
मनात नसताना रोहित-विराट 'तो' निर्णय घेणार? मोठी माहिती आली समोर
8
CJI गवईंवर बूट फेकणाऱ्या वकिलाला शरद पवारांचे खासदार निलेश लंकेंनी दिल्लीत गाठले; त्यानंतर...
9
महिलेने रडत रडत केला फोन, पोलिसांना सांगितलं पतीचं गुपित, घराची झडती घेताच बसला धक्का 
10
क्रिकेटच्या मैदानात AI ची ‘बोलंदाजी’! मिताली राजनं पिच रिपोर्टसाठी घेतली गुगल ‘जेमिनी’ची मदत, अन्...
11
आता भारतातच मिळणार जागतिक दर्जाचे शिक्षण; ब्रिटनची 9 विद्यापीठे उघडणार कॅम्पस
12
UNSC मध्ये भारताला ब्रिटनचा पाठिंबा! मुक्त व्यापार करारावर शिक्कामोर्तब; खलिस्तानवाद्यांवर कारवाईची मागणी
13
रस्त्यावर बेशुद्ध अवस्थेत सापडली महिला; शुद्धीवर आल्यावर सांगितलं असं; ऐकून सगळेच चक्रावले!
14
शाब्बास रिचा! सेंच्युरी हुकली; पण 'नॉट रिचेबल' वाटणारा टप्पा गाठला अन् मोठा डावही साधला
15
रावळपिंडी चिकन टिक्का, बहावलपूर नान, तर..., हवाई दलाच्या मेन्यू कार्डमधून पाकिस्तानची खिल्ली
16
शुभमन गिलच्या कर्णधारपदावर सौरव गांगुलींचे मोठे विधान, म्हणाला...
17
वारंवार मागणी केल्याने डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कार मिळेल? शर्यतीत कोण? जाणून घ्या...
18
'आम्ही सगळेच स्तब्ध झालो होतो, पण आता...', बूट फेकण्याच्या घटनेवर CJI गवई स्पष्टच बोलले
19
रोहित पवारांच्या मातोश्रींकडून गुंड निलेश घायवळचे कौतुक; सचिन घायवळसोबतचेही फोटो आणले समोर
20
Crime: एकाच कुटुंबातील तिघांवर प्राणघातक हल्ला, ५०० सीसीटीव्हीच्या मदतीने हल्लेखोराला अटक

नवीन पनवेलमध्ये हवा भुयारी मार्ग

By admin | Updated: November 19, 2016 02:49 IST

नवीन पनवेलमधील पोदी येथून जुन्या पनवेलकडे जाण्यासाठी रेल्वे गेट आहे.

पनवेल : नवीन पनवेलमधील पोदी येथून जुन्या पनवेलकडे जाण्यासाठी रेल्वे गेट आहे. येथून महामार्गावरही जवळ पडतो. कायम वर्दळीच्या असलेल्या या मार्गावर पूल अथवा भुयारी मार्ग बांधण्यात यावा, अशी मागणी रहिवाशांच्या वतीने अ‍ॅड. मनोज भुजबळ यांनी केली आहे. नवीन पनवेलमधील सेक्टर १५, १५ ए, पोदी नं. १ व विचुंबे या भागातून राष्ट्रीय महामार्गावर जाण्यासाठी पोदी जवळील रेल्वे गेट ओलांडून किंवा एचडीएफसी सर्कलच्या पुलावरून जावे लागते. पुलावर नेहमीच वाहतुकीची कोंडी होते. माथेरान रस्त्याकडून व डीमार्टकडून येणारी वाहतूक याच पुलावरून होते. या भागात लोकवस्तीबरोबरच वाहनांची वर्दळही वाढल्याने पोदीजवळ असलेले रेल्वे गेटचा वापर दिवसेंदिवस धोकादायक ठरत आहे. गेट बंद असूनही अनेक जण खालून सायकल किंवा दुचाकी काढतात. त्यामुळे अपघाताची शक्यता वाढली आहे. अनेकदा शाळकरी मुलेही गेट बंद असताना खालून प्रवास करतात. त्यामुळे रेल्वे गेटऐवजी याठिकाणी पूल अथवा भुयारी मार्ग बांधावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे. (वार्ताहर)>भविष्यातील येथील लोकवस्ती वाढणारच आहे. परिणामी वाहतुकीची समस्या आणखी जटील होईल. राष्ट्रीय महामार्गावरून पुणे व कोकणात जाणाऱ्यांना पूल झाल्यास जवळ पडेल. लोकांचा वेळ वाचेल, गेट ओलांडताना अपघात होण्याचा धोका राहणार नाही.- अ‍ॅड. मनोज भुजबळ, अध्यक्ष बार असोसिएशन, पनवेल >पोदी नं. १ किंवा विचुंबेहून जुन्या पनवेलमध्ये येताना वाहतूक कोंडीला तोंड द्यावे लागते. रेल्वे गेटने जायचे तर रेल्वेची वाहतूक वाढल्याने लवकर उघडत नाही. त्यामुळे अनेक जण धोकादायक पध्दतीने गेट ओलांडतात. पूल झाल्यास कोंडीतून सुटका होईल.- प्रकाश विचारे, अध्यक्ष अश्वत्थामा ज्येष्ठ नागरिक संघ