मुंबई : आंबेडकर भवन प्रकरणी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी भाजपा आमदार आणि व्यावसायिक मंगल प्रभात लोढा यांच्यावर आरोप केले आहेत. या जागेवर लोढा यांचा डोळा असल्याचे त्यांनी म्हटले होते. त्यावर लोढा यांनी प्रत्युत्तर दिले.भाजपाचे एक धनाढ्य आमदार लोढा यांचा आंबेडकर भवनच्या जागेवर डोळा असल्याचा आरोप निरुपम यांनी केला होता. हा आरोप पूर्णपणे चुकीचा तसेच खोडसाळ असून, त्यात एक टक्का जरी तथ्य आढळले तरी मी राजकारणातून संन्यास घेण्यास तयार आहे, असे लोढा यांनी म्हटले आहे. तथापि, आरोप १०० टक्के खोटे असल्याचे सिद्ध झाल्यास निरुपम राजकारण संन्यास घेणार का? असे थेट आव्हान लोढा यांनी निरुपम यांना दिले आहे. राजकारणाला एवढ्या खालच्या पातळीवर नेणे चुकीचे असल्याचेही लोढा यांनी म्हटले आहे. (प्रतिनिधी)
‘...तर राजकारण सोडणार का?’
By admin | Updated: July 4, 2016 05:09 IST