शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
2
'आमच्याकडे सर्वाधिक अणुबॉम्ब, पृथ्वी 150 वेळा नष्ट होईल', डोनाल्ड ट्रम्पचा यांचा धक्कादायक दावा
3
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
4
Gold Silver Price 3 Nov: सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा बदल; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट Gold चे लेटेस्ट रेट
5
पाकिस्तानने अण्वस्त्रचाचणी केली, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
6
पडद्यामागचे तीन ‘शिल्पकार’! 'या' त्रिसूत्री धोरणासह भारतीय महिला संघानं लिहिली अविस्मरणीय स्क्रिप्ट
7
"मी तर चांगलं काम केलं होतं...", राष्ट्रीय पुरस्कार उशिरा मिळाल्याने शाहरुख खानने व्यक्त केली खंत
8
Tulasi Vivah 2025: तुलसी विवाहासाठी रामा तुळस योग्य की श्यामा? जाणून घ्या मुख्य भेद 
9
चीनला शह देण्याचा प्रयत्न! भारत ₹७००० कोटींपेक्षा अधिक रकमेची बनवतोय योजना
10
राज ठाकरे सकाळी ९च्या गर्दीत बदलापूर-कल्याणला चढून लोकल ट्रेनमध्ये विंडो सीट पकडू शकतील का?
11
Deepti Sharma : "मुलीला क्रिकेट खेळू देऊ नका..."; दीप्ती शर्माचे आई-वडील भावुक, सांगितला संघर्षमय प्रवास
12
टाटा ट्रस्ट्समध्ये नवा पेच! पुनर्नियुक्ती नाकारल्यानंतर मेहेली मिस्त्री यांचं मोठं पाऊल; सर्वांनाच पाठवली नोटीस
13
एकनाथ खडसेंच्या बंगल्यातून CD, पेनड्राईव्ह, कागदपत्रे चोरी झालेच नाहीत?, पोलीस तपासात काय समोर आलं?
14
राज ठाकरेंना दोन लाख मुस्लीम दुबार मतदार का दिसले नाहीत? शेलार म्हणाले, 'अजून वेळ गेलेली नाही'
15
'सीपीआर द्यायचं माहीत नाही, व्हिडीओ काढले'; महिला वकिलाचा कोर्टातच दुर्दैवी मृत्यू, शेजारीच होते रुग्णालय
16
हनिमूनसाठी जोडप्याने बुक केली दुबई ट्रीप, लाखो रुपये दिले; परदेशात पोहोचल्यावर बसला मोठा धक्का!
17
पाकिस्तानबद्दल एक गोष्ट सांगून डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचं टेंशन वाढवलं? असं काय म्हणाले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष?
18
यूपी, बंगाल, तामिळनाडूसह 12 राज्यांमध्ये उद्यापासून SIR प्रक्रिया सुरू; 'या' पक्षांचा तीव्र विरोध...
19
'भुल भूलैया ४'मध्ये अक्षय कुमार-कार्तिक आर्यन एकत्र येणार? चर्चा सुरु; दिग्दर्शक म्हणाले...

बंडखोर दगाफटका करणार की बाजी मारणार? दोन मतदारसंघात स्थिती : वाई अन् पाटणमध्ये काॅंटे की टक्कर 

By नितीन काळेल | Updated: November 4, 2024 19:36 IST

राज्यात मागील दोन वर्षांत राजकीय उलथापालथी अनेक घडल्या आहेत. त्याचे पडसाद आताच्या विधानसभा निवडणुकीत चांगलेच उमटलेत.

- नितीन काळेल लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : विधानसभा निवडणुकीसाठी आघाडी आणि महायुतीतील बंडखोरी शमविण्यात चांगलेच यश आले असले तरी वाई आणि पाटण मतदारसंघात दोघांनी माघार घेतलेली नाही. त्यामुळे संबंधित कोणाला दगाफटका करणार का, स्वत:च बाजी मारणार याकडे राजकीय वर्तूळाचे लक्ष राहणार आहे. तरीही दोन्ही ठिकाणी काॅंटे की टक्कर होणार हे स्पष्ट आहे.

राज्यात मागील दोन वर्षांत राजकीय उलथापालथी अनेक घडल्या आहेत. त्याचे पडसाद आताच्या विधानसभा निवडणुकीत चांगलेच उमटलेत. महायुती आणि महाविकास आघाडीतून अनेकजण इच्छुक होते. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदारसंघात मोठ्या संख्येने अर्ज दाखल झाले. आघाडी तसेच युतीतील अनेकांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज भरले. मनधरणीनंतर काहीजणांनी अपक्ष लढणे स्वीकारले. यामध्ये वाई आणि पाटण मतदारसंघातील बंडखोरी प्रामुख्याने समोर आलेली आहे.

वाई मतदारसंघातून शिंदेसेनेचे जिल्हाप्रमुख पुरूषोत्तम जाधव यांनी लढण्याची तयारी केली होती. पण, जागावाटपात मतदारसंघ पक्षाकडे येणार नाही हे लक्षात येताच त्यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडूनही चाचपणी केल्याची माहिती समोर आलेली. त्यानंतर त्यांनी जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा दिला आणि अपक्ष अर्ज भरला. जाधव यांनी यापूर्वी सातारा लोकसभा तसेच वाई विधानसभेचीही निवडणूक लढवलीय. अनेक वर्षांपासून ते राजकारणात सक्रीय आहेत. यामुळे त्यांची उमेदवारी युती की आघाडीच्या उमेदवाराला मारक ठरणार, का तेच बाजी मारणार हे मतमोजणीनंतरच स्पष्ट होणार आहे.

पाटण मतदारसंघ आघाडीत उध्दवसेनेकडे गेला. याठिकाणी हर्षद कदम उमेदवार आहेत. तर विरोधात शिंदेसेनेकडून पालकमंत्री शंभूराज देसाई आहेत. पण, याठिकाणी आघाडीतील राष्ट्रवादीतून सत्यजितसिंह पाटणकर अपक्ष रिंगणात आहेत. पाटणकर यांचा स्वत:चा गट आहे. या गटाची ताकद त्यांच्या पाठिशी राहील. तसेच आघाडीतील राष्ट्रवादी आणि काॅंग्रेसचीही छुपी ताकद सत्यजित यांना मिळण्याची अटकळ बांधली जात आहे. यामुळे निवडणुकीत पारंपरिकप्रमाणे देसाई आणि पाटणकर यांच्यातच प्रामुख्याने सामना होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४wai-acवाईpatan-acपाटण