शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
2
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
3
सलवार सूट घातला, त्यावर बुरखा चढवला अन् महिला डॉक्टरच्या घरात घुसून ७ वेळा चाकूने वार केला; नेमकं प्रकरण काय?
4
अरे ही कसली आई! १५ महिन्यांच्या लेकाला बस स्टँडवर सोडलं अन् इन्स्टा बॉयफ्रेंडसोबत पळाली
5
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
6
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
7
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश
8
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
9
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
10
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
11
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
12
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
13
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
14
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
15
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
16
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
17
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
18
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
19
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
20
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप

खासगी सावकारी करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाई करणार - दिवाकर रावते

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2018 14:08 IST

एसटीतील कर्मचाऱ्यांच्या आर्थिक अगतिकतेचा गैरफायदा घेऊन अनधिकृतपणे खासगी सावकारी व्यवसाय करणाऱ्या एसटीतील काही तथाकथित अधिकारी/कर्मचाऱ्यावर यापुढे कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी असे निर्देश परिवहन व खारभूमी विकास मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी एसटी प्रशासनास दिले होते.

मुंबई - एसटीतील कर्मचाऱ्यांच्या आर्थिक अगतिकतेचा गैरफायदा घेऊन अनधिकृतपणे खासगी सावकारी व्यवसाय करणाऱ्या एसटीतील काही तथाकथित अधिकारी/कर्मचाऱ्यावर यापुढे कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी असे निर्देश परिवहन व खारभूमी विकास मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी एसटी प्रशासनास दिले होते. त्यानुसार एसटीच्या सुरक्षा व दक्षता विभागामार्फत तातडीने परिपत्रक काढून अशा प्रकारे अवैध पद्धतीने व्याजाने पैसे देणाऱ्या अधिकारी/कर्मचाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश स्थानिक एसटी प्रशासनाला दिले आहेत. 

एसटी महामंडळात सुमारे १ लाख कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांच्या आर्थिक गरजा भागविण्यासाठी मध्यवर्ती स्वरूपाची एसटी कर्मचारी सहकारी बँक अस्तित्वात आहे. तसेच स्थानिक पातळीवर काही कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन सरकारी पतसंस्थांची स्थापना केली आहे. याबरोबरच एसटीच्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या वेतनावर आधारित सरकारी व सहकारी बँकातून पतपुरवठा केला जाऊ शकतो. असे असताना कर्मचाऱ्यांच्या अज्ञानाचा व आर्थिक अगतिकतेचा गैरफायदा घेऊन त्यांच्यातील काही कर्मचारी व अधिकारी अवैधरित्या खासगी सावकारीच्या माध्यमातून तब्बल १० ते ३० टक्के प्रती महिना या दराने पैसे व्याजाने देत असल्याबाबत व त्याच्या वसुलीसाठी बेकायदेशीररीत्या या कर्मचाऱ्यांवर दबाव आणत असल्याच्या तक्रारी रावते यांच्याकडे कर्मचाऱ्यांनी केल्या होत्या.  

ग्रामीण व शहरी भागातील एसटीच्या आगारात कर्मचाऱ्यांच्या 'भीशी'च्या नावाखाली असा छुपा खासगी सावकारांचा धंदा फोफावला होता. एसटीतील अनेक कर्मचारी अशा खासगी सावकारीच्या पाशात अडकले होते. काही ठिकाणी या तथाकथित सावकारीच्या अत्याचाराविरुद्ध पोलीस स्थानकात तक्रारी पण दाखल झाल्या होत्या. विशेष म्हणजे प्रशासनाने केलेल्या चौकशी अंती अशाप्रकारे सावकारी करणारे लोक एसटीचे कर्मचारी असल्याचे पुढे आले. काही एसटीचे अधिकारी/पर्यवेक्षक आपल्या अधिकाराचा गैरवापर करून आर्थिकदृष्टया नडलेल्या कर्मचाऱ्यांना व्याजाने पैसे घेण्यास प्रवृत्त करीत, नंतर व्याजासाठी त्यांच्यावर अवैधरित्या दबाव आणत  असत. अशा अनधिकृत सावकारांच्या धाक दपटशाहीमुळे संबंधित कर्मचारी त्यांना टाळण्यासाठी व तोंड लपविण्यासाठी आपल्या दैनंदिन कामावर गैरहजर राहू लागले. साहजिकच त्याचा विपरीत परिणाम एसटीच्या कामकाजावर होऊ लागला.

असे गैरप्रकार थांबविण्याच्या हेतूने एसटी महामंडळाच्या आवारात बेकायदेशीर व अनधिकृतरित्या व्याजाने पैसे देणे/घेणे बाबतचे व्यवहार करणाऱ्या व्यक्तींवर भारतीय दंड संहिता व महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ अन्वये दखलपात्र गुन्हा नोंदविण्याचे आदेश मुख्य सुरक्षा व दक्षता अधिकारी मनोज लोहिया यांनी परिपत्रकाद्वारे दिले आहेत. या कारवाईमुळे भविष्यात एसटीच्या सर्वसामान्य कामगारांचे आर्थिक शोषण करणाऱ्या अशा खासगी सावकारीला लगाम बसेल हे निश्चित.     

 

टॅग्स :Diwakar Raoteदिवाकर रावतेShiv Senaशिवसेना