शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
2
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
3
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
4
परराज्यातील मुलांना एमबीबीएसला प्रवेश घेण्याची मुभा द्या, पालघरच्या कॉलेजने घेतली उच्च न्यायालयात धाव
5
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
6
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
7
एक दिवस CM बनवलं तर काय कराल? अमृता फडणवीस म्हणाल्या- "मी देवेंद्रजींना..."
8
१२ वर्षांनी शतांक गजकेसरी योग: ८ राशींना लॉटरी, इच्छापूर्ती; नवीन नोकरी, अकल्पनीय पैसा-लाभ!
9
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
10
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
11
मराठी अभिनेता दुसऱ्यांदा होणार बाबा, पार पडलं पत्नीचं बेबी शॉवर; अरुण गवळीच्या मुलीसोबत थाटलाय संसार
12
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."
13
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
14
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
15
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
16
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
17
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
18
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
19
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
20
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज

राज्यकर्त्यांचे जिणे हराम करू

By admin | Updated: April 5, 2017 05:54 IST

भाजपाने निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासने पाळली असती तर शेतकऱ्यांना कर्जमाफी मागण्याची वेळी आली

पनवेल : भाजपाने निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासने पाळली असती तर शेतकऱ्यांना कर्जमाफी मागण्याची वेळी आली नसती, असे सांगत शेतकऱ्यांनो, जीव देऊ नका, कर्जमाफी मिळेपर्यंत आमचा संघर्ष सुरूच राहील. सरकारचे जिणे आम्ही हराम करू, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र आणि राज्य सरकारला दिला. शेतकरी कर्जमाफीसाठी विरोधी पक्षांनी काढलेल्या संघर्ष यात्रेच्या पहिल्या टप्प्याची सांगता मंगळवारी पनवेल येथे झाला. चंद्रपूरमधून सुरू झालेली ही संघर्ष यात्रा १५ जिल्ह्यातून सुमारे २५ हजार किमीचा प्रवास करून पनवेलमध्ये आली. देशातील २० राष्ट्रीयकृत बँकांची २ लाख ८० हजार ४९४ कोटी एवढी रक्कम कर्जदारांनी बुडवली, तरी सरकारने काहीच कारवाई केली नाही. पण शेतकऱ्यांना मदतीचा हात पुढे करण्यास सरकार तयार नाही. शेतकरी कर्ज परत करण्यासाठी धडपडत असतो. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलेला कर्जमाफीचा शब्द पाळा. टिंगल उडवू नका, अन्यथा शेतकरी सरकारला इंगा दाखवल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही पवार यांनी दिला. मी कृषीमंत्री असताना त्यावेळी आत्महत्येची माहिती ऐकल्यानंतर तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग अस्वस्थ झाले. वर्धा, यवतमाळ जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांची आम्ही भेट घेतली. त्यानंतर ७१ हजार कोटींचे कर्ज माफ केले. संपुआ सरकार हे करु शकले तर मोदी सरकार का करत नाही, असा सवाल पवार यांनी केंद्र सरकारला विचारला. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, नारायण राणे, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे, धनंजय मुंडे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, शेकापचे आमदार जयंत पाटील, सपाचे अबू आझमी आदींची भाषणे झाली. (प्रतिनिधी)>पुण्यात समताभूमीवर आसूड...पंढरपूर मुक्कामाहून निघून संघर्ष यात्रा पुण्यात आली. महात्मा फुले यांच्या निवासस्थानी समताभूमी येथे काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी दोन्ही पक्षांचे विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्र्यांना महात्मा फुले यांचा प्रतिकात्मक आसूड दिला.राज्यात कर्जबाजारीपणामुळे शेतकरी मरत आहेत. पण भाजपा सरकारला समृद्धी कॉरिडरसाठी कोट्यवधी रूपये खर्च करायचे पडले आहेत. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची व हमीभावाचा निर्णय होत नाही तोपर्यंत आम्ही संघर्ष थांबवणार नाही, असा निर्धार नेतेमंडळींनी बोलून दाखविला. अधिवेशन अजून तीन दिवस शिल्लक आहे. अन्यथा विशेष अधिवेशन बोलवावं. आम्ही यायला तयार आहोत. पण कोणत्याही परिस्थितीत कर्जमाफी झालीच पाहिजे. - अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतेभाजपा सरकारच्या काळात अडीच वर्षांत ९ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. कर्जमाफी दिली नाही तर भविष्यात आत्महत्येचा आकडा वाढण्याची भीती आहे. शेतकऱ्यांचा जीव वाचविण्यासाठी राज्यावर कर्ज झाले तरी चालेल, पण कर्जमुक्ती झाली पाहिजे. - अशोक चव्हाण, प्रदेशाध्यक्ष काँगे्रस शेतकऱ्यांच्या नावावर यात्रा काढून त्याला संघर्ष यात्रा असे नाव दिल्याने ती संघर्ष यात्रा ठरत नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नावरच्या यात्रा अशा मर्सिडीज बेंझमधून नसतात. तर, त्यासाठी जमिनीवर उतरून संघर्ष करावा लागतो, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील मूल येथे झालेल्या जाहीर सभेत लगावला.