शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

खासगी विमान व्यवसाय महाराष्ट्रातून जाणार? पार्किंग, विमान उतरण्यासाठीचे स्लॉट मिळणे कठीण होत असल्याची भावना

By अतुल कुलकर्णी | Updated: December 19, 2025 07:48 IST

नव्या विमानतळामुळे फरक पडणार का?

'एनएमआयए'चे फायदे/अपेक्षा : भाग ५

अतुल कुलकर्णी लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबई विमानतळावर खासगी विमानांना स्लॉट न मिळणे, पार्किंगसाठीची जागा उपलब्ध न होणे आणि जागा मिळालीच तरी त्याचे वाढते भाडे यामुळे मुंबईत नव्याने खासगी विमानांचा व्यवसाय येणे जवळपास बंद झाले आहे. त्याउलट मिळणाऱ्या सोयींमुळे दिल्ली, गुजरातसह इतर ठिकाणी हा व्यवहार खासगी विमान वाहतूक व्यवसाय वाढीला लागला आहे. 

देशात दोन आंतरराष्ट्रीय विमानतळ एकाच शहरात असणारे मुंबई एकमेव शहर आहे. इथे खासगी विमान वाहतुकीचा व्यवसाय वाढवण्यासाठी सर्व पूरक गोष्टी आहेत. मात्र, पार्किंग आणि विमान उतरण्यासाठीचे स्लॉट मिळणेकठीण होत असल्यामुळे नव्या कंपन्यांना अनुकूल वातावरण उरले नसल्याची भावना आहेत. मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे. वर्षानुवर्षांतून इथे एक इकोसिस्टीम तयार झाली आहे. त्यामुळे उद्योगपती, कार्पोरेट कार्यालये यांच्या प्रमुखांना मुंबईतून जाणे-येणे सोयीचे आहे. मात्र, हीच सोय दिवसेंदिवस महागडी होत आहे. त्यामुळे खासगी वाहतुकीसोबतच मोठे व्यावसायिक, उद्योजक अन्य राज्यात जाऊ लागले तर त्याचा परिणाम मुंबईच्या आर्थिक सत्ता केंद्रावर होईल, असे या क्षेत्रातील जाणकारांचे मत आहे.

व्यावसायिक तत्त्वावर खासगी वापरासाठी उपलब्ध विमाने / हेलिकॉप्टर

राज्य         एकूण कंपन्या     विमाने      हेलिकॉप्टरदिल्ली            ३९                     ८७          ५८महाराष्ट्र           २८                    २५          २१गुजरात            १३                    ३२           २

'डीजीसीए' नुसार देशात १३३ खासगी विमान कंपन्यांकडे २१४ खासगी विमाने व २२१ हेलिकॉप्टर आहेत. त्याशिवाय ११ हॉट एअर बलून आहेत. यापैकी महाराष्ट्रात खासगी विमानाद्वारे व्यवसाय करणाऱ्या मोजक्याच कंपन्या आहेत. भारतात जवळपास ३५० विमानतळे आहेत. याउलट अमेरिकेत सुमारे ४२ हजार खासगी विमाने असून, १५ ते १८ हजार खासगी विमानतळे आहेत. अमेरिका श्रीमंत आहे म्हणून त्यांच्याकडे मोठे हायवे नसून, त्यांच्याकडे मोठे हायवे आहेत म्हणून अमेरिका श्रीमंत आहे, असे अमेरिकेबद्दल सांगितले जाते. हाच संदर्भ घेतला तर कुठलेही विमानतळ हे राज्याच्या प्रगतीचे, उद्योगाच्या विकासाचे माध्यम म्हणून त्याकडे बघितले पाहिजे. त्यासाठीखासगी उद्योजक, कार्पोरेट कंपन्या यांना लागणारी इकोसिस्टीम उपलब्ध करून दिली तर ती राज्ये विकासात पुढे जातात. आपल्याकडे नेमके हेच क्षेत्र दिवसेंदिवस संकुचित होत चालले आहे.

ज्या मुंबईत खासगी विमानांच्या व्यवसायाची सुरुवात झाली, त्याच मुंबईत आता खासगी विमानांना येण्याजाण्यासाठी वेळ मागितली तर पहिले प्राधान्य प्रवासी विमान वाहतुकीला दिले जाते. मुंबई विमानतळावर स्लॉट मिळत नाहीत या कारणामुळे खासगी विमान वाहतुकीचा व्यवसाय आता दिल्ली, अहमदाबाद, बंगळुरू येथे जात आहे. (सोबतच्या चार्टवरून तपशील लक्षात येईल.) मुंबई विमानतळावर पार्किंग आणि येण्या-जाण्याचे स्लॉट मिळत नाहीत.

पुण्याचे विमानतळ डिफेन्सचे आहे, म्हणून तिथे खासगी विमान वाहतूक करणाऱ्यांना जागा मिळत नाही. मध्यंतरी नागपूर मिहानकडे या व्यावसायिकांना वळविण्याचे प्रयत्न झाले; पण त्याला फारसे यश मिळाले नाही. ज्या शहरात उद्योजकांना यावे वाटते तेथे सुविधा मिळायला हव्यात. मुंबई, पुण्यातून व्यवसाय करण्याची इच्छा असताना इथे जर सुविधा मिळत नसतील तर नाइलाजाने अनेकांनी हा व्यवसाय अन्य राज्यांमध्ये नेणे सुरू केल्याचे या क्षेत्रातील उद्योजक सांगतात.

नवी मुंबई विमानतळ सुरू झाल्यानंतर मुंबईत खासगी विमान आले की त्यांना पाकिंगसाठी नवी मुंबईत जायला सांगितले जाईल अशी चर्चा आहे. तसे झाले तर प्रवाशांना घेण्यासाठी पुन्हा मुंबई विमानतळावर यावे लागेल. त्यामुळे नवी मुंबई आणि मुंबई विमानतळावर त्यांना उतरण्याचे, उडण्याचे व पार्किंगचे अतिरिक्त पैसे द्यावे लागतील. परिणामी असा प्रवास करणाऱ्यांचे दर तिप्पट होऊ शकतात. त्यामुळे भविष्यात असे खासगी प्रवासी उद्योग व उद्योजक अन्य राज्यात गेले तर त्यात मुंबईचे व पर्यायाने महाराष्ट्राचे मोठे नुकसान होऊ शकते, असेही अनेकांचे मत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Private plane business leaving Maharashtra? Parking, slots becoming difficult.

Web Summary : Mumbai's private aviation faces challenges. Limited slots and parking force businesses to Delhi and Gujarat. High costs threaten Mumbai's economic hub status as companies relocate. New Mumbai airport policies could worsen the situation.
टॅग्स :AirportविमानतळMaharashtraमहाराष्ट्रNavi Mumbaiनवी मुंबई