शहरं
Join us  
Trending Stories
1
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
3
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
4
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
5
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
6
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
7
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
8
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
9
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
10
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
11
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
12
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
13
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
14
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
15
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
16
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
17
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
18
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
19
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
20
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...

रिकाम्या हाती परतणार नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 04:11 IST

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी राज्यभर घोंगावलेले मराठा क्रांती मूक मोर्चाचे वादळ ९ आॅगस्टला मुंबईत धडकणार आहे.

मुंबई : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी राज्यभर घोंगावलेले मराठा क्रांती मूक मोर्चाचे वादळ ९ आॅगस्टला मुंबईत धडकणार आहे. सकल मराठा समाजाच्या नेतृत्वाखाली मुंबईत राज्यव्यापी मोर्चा निघणार असून, या वेळी रिकाम्या हाती परतणार नसल्याचा निर्धार महामोर्चाच्या समन्वयकांनी व्यक्त केला आहे.सकल मराठा समाजाच्या महामुंबई समितीमधील वीरेंद्र पवार यांनी सांगितले की, मुंबईतील महामोर्चासाठी सर्व जिल्ह्यांतील प्रतिनिधींनी कंबर कसली आहे. दादरमधील शिवाजी मंदिर येथे महामोर्चाची वॉररूम तयार केली आहे. अहमदनगर, पुणे, सोलापूर, कोल्हापूर, औरंगाबाद, सातारा यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींसोबत झालेल्या संपर्कातून महामोर्चाचे सकारात्मक वातावरण निर्माण झाल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे नेमके किती लोक येतील, याची निश्चित आकडेवारी सांगणे चुकीचे ठरेल. मात्र मुंबई ठप्प पडेल, इतका मराठा समाज या महामोर्चात उतरण्याची शक्यता नाकारता येत नाही.महामोर्चाची रंगीत तालीम म्हणून ६ आॅगस्टला नवी मुंबई आणि रायगडमध्ये दुपारी ३ वाजता बाइक रॅली काढण्यात येणार असल्याचे महामुंबई समितीचे विनोद पोखरकर यांनी सांगितले. ते म्हणाले की, राज्यभरात या आठवड्यात ठिकठिकाणी बाइक रॅली पाहायला मिळतील. मात्र महामोर्चा काढण्यात येणार असल्याने मुंबईत केवळ विभागनिहाय बाइक रॅली निघण्याची शक्यता आहे. तरीही नवी मुंबईतील बाइक रॅलीतून मुंबईच्या महामोर्चाचा अंदाज नक्कीच बांधता येईल.समन्वयक चर्चेस तयार नाही!महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी चर्चेसाठी केलेल्या आवाहनाला समन्वय समिती अनुकूल नसल्याचे समोर आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यासंदर्भातील बैठक चेंबूरमध्ये रविवारी पार पडली. त्यात ९ आॅगस्ट २०१६पासून राज्यभरात ५८ मोर्चे निघाले असून, समाजाच्या सर्व मागण्या सरकारला माहिती असल्यावर चर्चा झाली. त्यामुळे सरकारने जी काही घोषणा करायची आहे, ती एकतर विधानसभेत करावी किंवा मोर्चाला सामोरे जाऊन करावी, असा समन्वयकांचा होरा आहे.मुंबईतील मोर्चासाठी कोल्हापूर सज्जकोल्हापूर : संपूर्ण महाराष्टÑभर लाखोंच्या संख्येने मोर्चे निघाले, पण निर्णय नाही. आता ‘क्रांतिदिनी, क्रांती घडवू या’, ‘चलो मुंबई’ असा नारा देत सकल मराठा समाजाच्या वतीने पुन्हा मराठा आरक्षणाचा धुरळा उडविण्यासाठी सारे सज्ज झाले. बैठका, रॅलीतून पुन्हा मावळे, रणरागिणी अंग झटकून कामाला लागले आहेत. या मोर्चासाठी कोल्हापूर जिल्ह्यातून किमान ५० हजार जण उपस्थित राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मोर्चातील नियोजनाची सर्वस्वी जबाबदारी ही मावळे व रणरागिणीवर असते. त्यांची नोंदणी सध्या सकल मराठा समाज कार्यालयात केली जात आहे.औरंगाबादला दुचाकी रॅली-१औरंगाबाद : मुंबईत ९ आॅगस्टला काढण्यात येणाºया मराठा क्रांती मूक मोर्चाच्या पार्श्वभूमीवर शहरात मंगळवारी जनजागृतीसाठी दुचाकी रॅली काढण्यात आली. त्यात मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.२सुमारे दोन कि़मी.पर्यंतच्या परिसरात दुचाकी होत्या. शिवछत्रपती महाविद्यालय येथून शिस्तीमध्ये निघालेली ही रॅली जयभवानीनगर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पुढे सरकली. क्रांतिचौकात जोरदार घोषणा देतशिस्तीने पैठणगेट मार्गे सिटीचौक ते लेबर कॉलनीपर्यंत रॅली आली. तेथील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले.३कॅनॉट गार्डनमध्ये राष्ट्रगीताने रॅलीचा समारोप झाला. रॅलीमध्ये कुठेही बेशिस्तपणा नव्हता. स्वयंसेवकांनी पोलिसांना मदत केली. मोर्चात सामील होण्यासाठी कॉर्नर बैठका, सोशल मीडियातून एसएमएस पाठविण्याचे नियोजन सुरू आहे, असे मराठा क्रांती मोर्चाच्या संयोजन समितीने सांगितले.