शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

तुमचे म्हणणे सेकंदभरही ऐकणार नाही; नवाब मलिकांना तात्पुरता दिलासा देण्यास हायकोर्टाचा नकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2022 08:41 IST

मलिक यांची याचिका जेव्हा सुनावणीस आली तेव्हा न्या. कर्णिक यांच्या एकलपीठाने मलिक यांचे वकील अमित देसाई यांना विचारले की, या याचिकेवर इतक्या तत्काळ सुनावणी का घ्यावी?

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित दहशतवादप्रकरणी आरोपी असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी मंत्री नवाब मलिक यांना तातडीने दिलासा देण्यास उच्च न्यायालयाने मंगळवारी नकार दिला. ‘तुम्हाला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मी तुमची बाजू एक सेकंदही ऐकणार नाही. अन्य याचिका प्रलंबित आहेत. तुम्हाला नंतर रुग्णालयातून सोडले तरी तुमच्यावर उपचार केले जात नाहीत, हे सिद्ध करावे लागेल. तेव्हाच मी तुमचे म्हणणे ऐकेन,’ असे न्या. मकरंद कर्णिक यांनी सांगितले.

मलिक यांची याचिका जेव्हा सुनावणीस आली तेव्हा न्या. कर्णिक यांच्या एकलपीठाने मलिक यांचे वकील अमित देसाई यांना विचारले की, या याचिकेवर इतक्या तत्काळ सुनावणी का घ्यावी? याबाबत माझे समाधान करा. ‘मी ही सवलत केवळ वैद्यकीय कारणासाठी देतो, तेसुद्धा वैद्यकीय उपचार उपलब्ध नसतील तरच ही सवलत मिळू शकते,’ असेही न्या. कर्णिक म्हणाले.

त्यावर ईडीतर्फे अतिरिक्त महान्यायअभिकर्ता अनिल सिंग यांनी न्यायालयाला सांगितले की, मे २०२२ पासून नवाब मलिक त्यांनीच निवडलेल्या खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. याचा अर्थ याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याची आवश्यकता नाही. काही दिवसांनी सुनावणी घेऊ शकतो, असे न्यायालयाने म्हटले.

 मलिक यांची एकच किडनी व्यवस्थित असून त्यांच्या दुसऱ्या किडनीचे प्रत्यारोपण करायचे आहे आणि कदाचित ईडी त्यांना रुग्णालयातून सोडण्यासाठी अर्ज करील. 

 मलिक यांच्या कुुटुंबीयांना किडनी प्रत्यारोपणासाठी प्रक्रिया सुरू करायची आहे. त्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांना भेटणे व त्यांच्याशी चर्चा करण्याची आवश्यकता भासेल, असे देसाई यांनी न्यायालयाला सांगितले.

 त्यांना (मलिक) शस्त्रक्रिया करावी लागली किंंवा आणखी काही तर त्यास ईडी विरोध करणार नाही. जर आरोग्याशी निगडित काही असेल तर सिंग निश्चितच विरोध करणार नाहीत, असे म्हणत न्यायालयाने ईडीला दोन आठवड्यांत उत्तर देण्याचे निर्देश दिले.

टॅग्स :nawab malikनवाब मलिकHigh Courtउच्च न्यायालय