मुंबई : राज्यात कोणत्याही परिस्थितीत स्थानिक संस्था कर (एलबीटी) रद्द केला जाणार असून तीच सरकारची व पक्षाची भूमिका असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज स्पष्ट केले. ते म्हणाले, एलबीटीला कोणता पर्याय असावा याची चर्चा करण्यास काल बैठक बोलाविली होती. तसेच, लवकरच केंद्र स्तरावरील वस्तू व सेवा कायदा (जीएसटी) येणार असल्याने याबाबत केंद्र सरकारकडे मांडावयाच्या राज्य सरकारच्या भूमिकेबाबत वेगळी बैठक बोलविली होती. एलबीटी रद्द करावा, ही आमची भूमिका कायम आहे. यावर आम्ही घुमजाव केलेले नाही. मात्र, एलबीटी हा महापालिकांच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत आहे. महापालिकांची आर्थिक स्वायत्तता अबाधित राहावी यासाठी एलबीटीला पर्याय शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या पर्यायाविना एलबीटी रद्द केल्यास महापालिकांसमोर आर्थिक संकट उभे राहील. म्हणूनच एलबीटीला पर्याय शोधण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. (विशेष प्रतिनिधी)
एलबीटी रद्द करणारच - मुख्यमंत्री
By admin | Updated: November 22, 2014 03:11 IST