शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: सर्वाधिक रुग्ण सापडलेल्या भागांसाठी सरकारचा प्लान तयार? आरोग्यमंत्र्यांचे संकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2020 16:14 IST

Coronavirus कोरोनाबाधितांची संख्या जास्त असलेल्या भागांत पूर्ण जमावबंदी लागू करण्याचा विचार

मुंबई: राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्यानं वाढ होत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा झपाट्यानं वाढल्यानं राज्य सरकारनं आता महत्त्वाची पावलं टाकण्यास सुरुवात केली आहे. मागील दिवसांत काही विशिष्ट भागांत कोरोनाचे रुग्ण आढळून आल्यानं या भागात पूर्ण जमावबंदीचा विचार सुरू असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली. त्यामुळे कोरोना हॉटस्पॉटवर लवकरच पूर्ण जमावबंदी लागू होऊ शकते.गेल्या काही दिवसांत कोरोबाधितांचा आकडा वाढत आहे. कोरोनाच्या चाचण्यांचं प्रमाण वाढत असल्यानं रुग्णांचं प्रमाण वाढलं आहे. कोरोनाचं निदान होत असल्यानं लागण झालेल्या रुग्णांवर तातडीनं उपचार करणं शक्य होत असल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली. प्रत्येक जिल्ह्यात कोविड रुग्णालयांची उभारणी करण्याचं काम सुरू आहे. एन-९५ मास्क आणि व्हेंटिलेटर्सचं उत्पादन वाढवण्यावर भर दिला जात आहे. सध्याची परिस्थिती पाहता अंगणवाडी सेविकांना ऑनलाईन ट्रेनिंग दिलं जाणार आहे, असं टोपेंनी सांगितलं.सोशल डिस्टन्सिंगची अंमलबजावणी करण्याचं आवाहन त्यांनी पुन्हा एकदा केलं. निझामुद्दीनमध्ये आयोजित तबलिगी जमातीच्या मरकजमध्ये सहभागी झालेल्या १३०० जणांचा शोध घेण्यात यश आलं असून त्यांना क्वॉरेंटाईन करण्यासाठी हालचाली सुरू झाल्याची माहिती त्यांनी दिली. आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्व मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला. केंद्राच्या सर्व सूचनांचं राज्याकडून पालन करण्यात येईल, असं मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना सांगितलं. या बैठकीत सर्वच राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केंद्राकडे थकीत असलेल्या जीएसटीचा मुद्दा उपस्थित केला. राज्याचे १६ हजार कोटी रुपये केंद्रानं अद्याप दिलेले नाहीत. सध्याची आर्थिक परिस्थिती पैशाची चणचण भासू लागली आहे. त्यामुळे केंद्रानं राज्याचा जीएसटीचा वाटा द्यावा, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केल्याचं टोपेंनी सांगितलं. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्याRajesh Topeराजेश टोपे