शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

महापौर आणेल, अन्यथा निवडणूक लढणार नाही!

By admin | Updated: January 24, 2017 22:47 IST

महानगरपालिकेच्या निवडणुकीत महापौर निवडून आणेल, अन्यथा मी भविष्यात निवडणूक लढणार नाही, अशी घोषणा माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे यांनी केली.

राष्ट्रवादी पक्षप्रवेश सोहळा : गुलाबराव गावंडे यांची घोषणाअकोला : अकोला महानगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस जोमाने काम करेल, यावेळी आघाडीचा महापौर नक्कीच होईल, असा विश्वास व्यक्त करीत आघाडीचा महापौर निवडून आणेल, अन्यथा मी भविष्यात निवडणूक लढणार नाही, अशी घोषणा माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे यांनी केली. येथील खुले नाट्यगृहामध्ये त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश सोहळ्यानिमित्त आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी मंचावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, आमदार प्रकाश गजभिये, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते वसंतराव धोत्रे, माजी आमदार तुकाराम बिरकड, राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी आघाडीचे संग्राम कोते पाटील, अकोला जिल्हाध्यक्ष विजय देशमुख, महानगर अध्यक्ष अजय तापडिया, वाशिम जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, विदर्भ संघटक रामेश्वर पवळ व संतोष कोरपे आदी उपस्थित होते.गावंडे म्हणाले, की शिवसेना-भाजपाने अकोला शहराला भकास केले. हे दोन्ही पक्ष शेतकऱ्यांची दिशाभूल करणारे आहेत. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद निश्चितच वाढणार आहे. जिल्हाध्यक्ष विजय देशमुख व मी गुरू-शिष्य आहोत. आता नव्या दमाने एकत्र काम करण्यासाठी सज्ज झालो आहोत, त्यामुळे महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता नक्कीच येईल. जर सत्ता आणू शकलो नाही, तर भविष्यात कुठलीच निवडणूक लढणार नाही, अशी घोषणा त्यांनी केली. जिल्हाध्यक्ष विजय देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मनपा निवडणुकीत मोठी ताकद निर्माण करणार असल्याचे सांगत, गावंडे यांच्या प्रवेशामुळे पक्षाला बळ मिळाल्याचे त्यांनी सांगितले. महानगर अध्यक्ष अजय तापडिया यांनी प्रस्तावना केली. संचालन दिलीप आसरे तर आभार संग्राम गावंडे यांनी केले. यावेळी श्रीकांत पिसे पाटील, रमेश हिंगणकर, शिरीष धोत्रे, ऋषिकेश पोहरे, सै. युसूफ अली, रफीक सिद्दिकी, आशा मिरगे, पद्मा अहेरकर, मंदा देशमुख व सचिन वाकोडे आदी उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमासाठी संग्राम गावंडे व युवराज गावंडे यांच्यासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.