शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

संमेलनाला शिक्षकांची उपस्थिती रोडावणार?

By admin | Updated: January 30, 2017 01:55 IST

शहरात होणाऱ्या नव्वदाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनास उपस्थित राहणाऱ्या शिक्षकांकडून तीन हजार रुपये शुल्क आकारले जाणार आहे.

जान्हवी मोर्ये, डोंबिवलीशहरात होणाऱ्या नव्वदाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनास उपस्थित राहणाऱ्या शिक्षकांकडून तीन हजार रुपये शुल्क आकारले जाणार आहे. त्यामुळे शिक्षकवर्गात नाराजीचा सूर असून ते संमेलनाला पाठ दाखवण्याची शक्यता आहे. साहित्य संमेलनाला मराठी हा विषय शिकवणाऱ्या शिक्षकांना आमंत्रित करण्यात आले आहे. शिक्षकांना संमेलनास उपस्थित राहता यावे, यासाठी त्यांना तीन दिवस भरपगारी रजा दिली जाणार आहे. मात्र, दुसरीकडे आयोजकांनी त्यांना संमेलनात सहभागी होण्यासाठी शुल्कात सूट दिलेली नाही. त्यांच्याकडून तीन हजारांचे शुल्क आकारले जाणार आहे. ते भरण्यास शिक्षक तयार नाहीत. परंतु, अनेक शाळांचे मुख्याध्यापक शिक्षकांना संमेलनात सहभागी होण्यासाठी सक्ती करीत आहेत, अशी माहिती काही शिक्षकांनी नाव न छापण्याच्या अटीवर दिली.साहित्य संमेलनानिमित्त मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीच्या विकासासाठी मराठीवर उपजीविका असणाऱ्यांनी शुल्क भरल्यास त्यात काही वावगे नाही. त्यांच्याकडून हे मराठीसाठी दान समजले जाईल. तसेच मराठीसाठी शालेय विद्यार्थ्यांनी प्रत्येकी १० रुपये द्यावे, असेही आवाहन केले जात आहे. विद्यार्थ्यांनी कमीतकमी १० रुपये व जास्तीतजास्त १०० रुपये दिले तरी आयोजकांना चालणार आहे. ही बाब उघडपणे केली जाणार नसली तरी हा निधी घेतला जाणार आहे. संमेलनासाठी आतापर्यंत एक कोटी ५८ लाख रुपयांचा निधी जमा झाला आहे. अन्य माध्यमांतून आणखी ६० लाख रुपये मिळणे अपेक्षित आहे. निधी कमी जमा झाल्याने विविध मार्गांनी मदत कशी मिळेल, यावर आयोजकांचा अधिक भर आहे. त्यासाठी विद्यार्थी व शिक्षकांना वेठीस धरले जात आहे, अशी भावना काही शिक्षकांनी व्यक्त केली आहे. साहित्य संमेलन हा उत्सव नाही. तरी त्याला उत्सवाचे स्वरूप आले आहे. उत्सवप्रिय शिक्षकांना संमेलनात सहभागी होण्याची घाई झाली आहे. खरोखर विद्यादान करणारे शिक्षक संमेलनापासून दूर राहिल्यास तेथे केवळ उत्सवप्रिय शिक्षकांची गर्दी दिसू शकते. संमेलनास चाळिशीच्या पुढील वर्ग उपस्थित असतो. सध्याची पिढी ही मराठीऐवजी इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेत असल्याने तिला संमेलनाविषयी आवड व अप्रूप नाही. त्यामुळे शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थीही कितपत सहभागी होतील, याविषयी शंकाच व्यक्त होत आहे. केडीएमसीच्या क्रीडासंकुलात ३ ते ५ फेब्रुवारीदरम्यान साहित्य संमेलन होत आहे. मात्र, तेथे पालिकेचे अवघे दोन सुरक्षा कर्मचारी असल्याने ते अपुरे पडत आहेत. त्यासाठी मानपाडा पोलीस ठाण्याने चौकी उभारावी, अशी विनंती पालिकेने केली होती. मात्र, चौकी उभारणे शक्य नसून २ फेब्रुवारीपासून २४ तास बंदोबस्त ठेवला जाईल, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.क्रीडासंकुलात पोहण्याचा तलाव, व्यायामशाळा, मैदान असल्याने तेथे मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. मात्र, रात्री मैदानात मद्यपान, चरस, गांजा आदी अमली पदार्थांचे खुलेआम सेवन केले जाते. भुरट्या चोरांनी बाथरूममधील नळ आदी साहित्य चोरून नेले आहे. स्वच्छतागृहही खराब करतात. त्यामुळे चौकी उभारावी, अशी विनंती पालिकेने आगरी युथ फोरमने केली होती. मात्र, अपुऱ्या मनुष्यबळामुळे चौकी उभारणे शक्य नाही. मात्र, मान्यवर येणार असल्याने २ फेब्रुवारीपासून २४ तास बंदोबस्त तैनात केला जाईल, असेही सांगण्यात आले. दरम्यान, यामुळे संमेलन पाच एकर जागेवर भरणार असून दोन खाजगी सुरक्षारक्षक कसे पुरतील, असा प्रश्न आयोजकांना आहे.