शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

येऊरमध्येही वन्यजीव गणना

By admin | Updated: May 18, 2016 03:17 IST

प्राणी - पक्ष्यांचे अस्तित्त्व आहे की नाही यासाठी वनविभागातर्फे दरवर्षीप्रमाणे करण्यात येणारी वन्यजीव गणना याही वर्षी केली जाणार आहे.

ठाणे : येऊर परिक्षेत्रात वावर असलेल्या प्राणी - पक्ष्यांचे अस्तित्त्व आहे की नाही यासाठी वनविभागातर्फे दरवर्षीप्रमाणे करण्यात येणारी वन्यजीव गणना याही वर्षी केली जाणार आहे. या परिक्षेत्रातील २० पाणवठ्यांवर ती केली जाणार असून बुद्धपौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच येत्या २१ मे रोजी तिला सुरूवात होणार आहे. येऊर वनपरिक्षेत्र विस्तीर्ण परिसर आहे. या परिक्षेत्रांतर्गत येऊर, घोडबंदर, चेना आणि नागलाबंदर ही चार ठिकाणे येतात. या परिसरात साधारणपणे बिबट्या, रानमांजर, तरस, रानडुक्कर, विविध प्रकारांचे पक्षी, अजगर, नाग, सांबर, चितळ, माकडं, वानरं, मुंगूस, वटवाघूळ, घुबड, रानकोंबडी, मोर, भेकर या वन्यजीवांचा वावर आहे. दरवर्षी वन्यजीव गणनेच्या माध्यमातून या वन्यजीवांचे निरीक्षण आणि संख्या नोंदविली जाते. २१ मे रोजी गणनेस सुरूवात होणार असून यासाठी वनविभाग कर्मचारी आणि स्वयंसेवक सज्ज झाले आहेत. प्रत्येक ठिकाणी एक ते दोन कर्मचारी आणि त्यांच्यासह एका स्वयंसेवकाची नेमणूक केली आहे. या दिवसांत जंगलात पाणी देखील कमी असते त्यामुळे नेमक्या ठिकाणी असलेल्या पाणवठ्यांवर येऊन प्राणी पक्षी येऊन पाणी पितात. या पाणवठ्यांवर येणाऱ्या प्राणी पक्ष्यांचे निरीक्षण करुन त्यांची संख्या नोंदविली जाणार आहे. (प्रतिनिधी)याव्यतिरिक्त वन्यजीवांचे ओरखडे, विष्ठा, त्यांची पाऊले यांसारख्या खुणांवरुन ही गणना केली जाणार असल्याचे येऊर वनविभागातर्फे सांगण्यात आले आहे. गणना दरम्यान शांतता पाळणे अत्यंत महत्त्वाचे आहे, एकमेकांशी बोलू नये, सफेद रंगाचे कपडे परिधान करु नये, मोबाईलचा वापर टाळावा, कॅमेराचा वापर न करणे आदी सूचनांचे पालन करणे बंधनकारक असते. २४ तास ही गणना सुरू असेल, असेही सांगण्यात आले आहे.