शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भ, मराठवाड्याला वावटळीसह गारपिटीचा इशारा, तर राज्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज

By admin | Updated: March 1, 2016 22:50 IST

वकाळी पावसाने गेल्या दोन दिवस विदर्भ, मराठवाड्याला झोडपले असतानाच पुढील दोन दिवस गोव्यासह संपूर्ण राज्याच्या तुरळक भागात मेघगर्जनेसह गारपीट तसेच वावटळ होण्याचा शक्यता आहे़

ऑनलाइन लोकमत

पुणे, दि. १ -  अवकाळी पावसाने गेल्या दोन दिवस विदर्भ, मराठवाड्याला झोडपले असतानाच पुढील दोन दिवस गोव्यासह संपूर्ण राज्याच्या तुरळक भागात मेघगर्जनेसह गारपीट तसेच वावटळ होण्याचा शक्यता आहे़. मध्य महाराष्ट्राच्या तुरळक ठिकाणी गारांसह गडगडाटी पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे़. ही स्थिती आणखी तीन दिवस राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे़ गेले दोन दिवस दक्षिण कोकण -गोवा, मध्य महाराष्ट्र ते पश्चिम मध्य प्रदेश या दरम्यान असलेली हवेच्या दाबाचे द्रोणीय क्षेत्र आता दक्षिण कोकण -गोवा ते दक्षिण गुजरातपर्यंत आहे़त्याचा परिणाम विदर्भ, मराठवाड्यासह, मध्यप्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा, आंध्र प्रदेश किनारपट्टी, तामिळनाडू येथील अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस पडत आहे़ गेल्या २४ तासांत विदर्भात काही ठिकाणी तसेच मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडला़ त्यात विदर्भात अहेरी, सावली, सिंदेवाही येथे ७० मिमी, चिमूर ६०, भामरागड, गडचिरोली प्रत्येकी ४० मिमी, आमगाव, एटापल्ली, जिवती, मूल, मुलचेरा ३०, आर्णी, चामोर्शी, दारव्हा, देवळी, परतवाडा, साकोली २०़ आरमोरी, बल्लारपूर, भद्रावती, बुलढाणा, चांदूरबाजार, चिखलदरा, देवरी, धामणगाव, धानोरा, गोंदिया, आंधप्रदेश, गोंडपिंपरी, हिंगणघाट, कोरपना, लाखनी, मंगरुळपीर, मानोरा, नागभिड, नांदुरा, पोम्भूर्णा, राजूरा, तिवसा, नागपूर येथेही पाऊस झाला़ मराठवाड्यात परभणी येथे २२़५ मिमी पावसाची नोंद झाली़ धुळे येथे १० मिमी पाऊस झाला़ कमी दाबाचा पट्टा आता गोव्याकडे सरकला असून त्यामुळे पुढील दोन दिवस गोव्यासह संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी गारांसह गडगडाटी पाऊस व वावटळ होण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे़ ४ मार्च रोजी मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या काही भागात तर कोकण, गोवा व विदर्भाच्या तुरळक भागात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे़ ५ मार्च रोजी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भाच्या तुरळक भागात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे़ मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत बुलडाणा १० मिमी, सातारा ५ आणि महाबळेश्वर येथे ३ मिमी पावसाची नोंद झाली आहे़ (प्रतिनिधी)--------------------