शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्राची तपास यंत्रणा कर्नाटक पोलिसांवर का विसंबून?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2019 05:32 IST

दाभोलकर, पानसरे हत्या प्रकरण; न्यायालयाने केली कानउघाडणी

मुंबई : डॉ. नरेंद्र दाभोलकर व कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्यांचा तपास करण्यास कर्नाटकातील यंत्रणांवर अवलंबून न राहता स्वतंत्रपणे तपास करा, अशा शब्दांत उच्च न्यायालयाने सीबीआय व सीआयडीला सुनावले.

पानसरे यांच्या हत्येचा तपास करण्यास सीआयडीच्या एसआयटीने तपास अहवाल सादर केल्यानंतर उच्च न्यायालयाने कानउघाडणी केली. दाभोलकर व पानसरे यांच्या हत्याप्रकरणांचा तपास करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करा, असे न्या. सत्यरंजन धर्माधिकारी व न्या. मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठाने बजावले.

पानसरेंचे मारेकरी शोधण्यास कर्नाटक पोलिसांनी गौरी लंकेश यांच्या हत्येतील अटक केलेल्या आरोपींची चौकशी करण्यात येणार आहे, असे एसआयटीने अहवालात नमूद केले. न्यायालयाने याची नोंद घेत म्हटले की, गेल्या सुनावणीतही सीबीआय व सीआयडीने दाभोलकर व पानसरेंचे मारेकरी शोधण्यासाठी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेल्यांची चौकशी करू, असे म्हटले होते. ‘कर्नाटकमध्ये घडलेल्या गुन्ह्यातील आरोपींची तुम्ही चौकशी करणार. मात्र तुमच्या अहवालात आरोपींना पकडण्यास काय पावले उचलणार, याचा उल्लेख नाही.

आरोपींनी अन्य गुन्ह्यांत दिलेल्या जबाबावर तुम्ही पूर्णपणे अवलंबून राहू शकत नाही. तुम्ही स्वतंत्रपणे तपास करा. स्वतंत्र पुरावे जमा करा; कारण हे दोन्ही गुन्हे आधी महाराष्ट्रात घडले आहेत. कर्नाटकात नंतर घटना घडली आहे. कर्नाटकातील तपास यंत्रणा प्रगती करत असून महाराष्ट्रातील पोलीस तपास करण्यात अपयशी ठरले आहेत, असे न्यायालयाने म्हटले.‘पोलीस मेहनत घेत आहेत’आरोपींना पकडण्यास पोलीस मेहनत घेत आहेत, असे सीबीआयतर्फे अ‍ॅडिशनल सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांनी न्यायालयाला सांगितले. अधिकारी काहीच करीत नाहीत, असे नाही. दोन्ही हत्यांचा तपास करण्यासाठी उत्तम पोलीस अधिकारी निवडले आहेत. महाराष्ट्रातील पोलीस कोणत्याही राज्यातील पोलिसांपेक्षा चांगले काम करीत आहेत, असे सिंग यांनी म्हटले. गौरी लंकेश हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या शरद कळसकर याने तो दाभोलकर व पानसरे हत्येत सहभागी असल्याचे मान्य केल्याचा सीबीआयचा दावा आहे.

टॅग्स :Narendra Dabholkarनरेंद्र दाभोलकरGovind Pansareगोविंद पानसरेKarnatakकर्नाटक