शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

विद्यापीठाचे ‘मार्केटिंग’ का करीत नाही?

By admin | Updated: November 28, 2014 01:06 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा दर्जा सातत्याने घसरत असून, विद्यार्थी मुंबई-पुण्यासारख्या शहरांकडे धाव घेत आहेत. ही स्थिती बदलण्यासंदर्भात प्रशासनाने ठोस पावले तातडीने

विद्वत परिषद बैठक : सदस्यांनी प्रशासनाला धरले धारेवरनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा दर्जा सातत्याने घसरत असून, विद्यार्थी मुंबई-पुण्यासारख्या शहरांकडे धाव घेत आहेत. ही स्थिती बदलण्यासंदर्भात प्रशासनाने ठोस पावले तातडीने उचलण्याची आवश्यकता आहे. यासंदर्भात विचार करून ठोस भूमिका तयार करून विद्यापीठाचे ‘मार्केटिंग’ करण्याची आवश्यकता असल्याचा सूर विद्वत परिषदेच्या बैठकीत उमटला. गुरुवारी झालेल्या बैठकीत निरनिराळ्या मुद्यांवर सदस्यांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले.नागपूर विद्यापीठांतर्गत येणारी महाविद्यालये व त्यातील अभ्यासक्रम बंद करण्याचे २५ ते ३० प्रस्ताव विद्यापीठासमोर आले आहेत. विद्यापीठात विद्यार्थ्यांची संख्या सातत्याने रोडावते आहे. यासंदर्भात प्रशासनाकडून काहीच ठोस पावले उचलण्यात येत नसल्याने, हे प्रश्न निर्माण झाले आहेत. विद्यापीठ केवळ पदव्या देण्यासाठी नाही तर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्याची जबाबदारी आहे. त्यामुळे दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्न करायला हवे, असे मत डॉ. प्रमोद येवले यांनी व्यक्त केले. डॉ. बबन तायवाडे यांनी विद्यार्थीसंख्या घटण्याची समस्या संपूर्ण राज्यभरात आहे. त्यामुळे मुंबई-पुण्याकडे विद्यार्थी का जातात याचा अभ्यास आवश्यक आहे, अशी सूचना केली.उच्चशिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ.डी.बी.पाटील यांनी विद्यापीठाच्या धोरणांवर जोरदार टीका केली. महाविद्यालयांना मान्यता प्रदान करताना तेथे पायाभूत सुविधा आहेत का, याचा विचार विद्यापीठ करते का? क्षमता मूल्यमापनाशिवायच बृहत् आराखडा का बनतो? महाविद्यालयांची व विद्यापीठाची ही दयनीय स्थिती विद्यापीठानेच निर्माण केली आहे. महाविद्यालयांची संख्या एखाद्या चक्रीवादळासारखी वाढत गेली तर असेच चित्र दिसेल, या शब्दात पाटील यांनी विद्यापीठावर ताशेरे ओढले.(प्रतिनिधी)प्रणालीतच समस्यायावेळी प्रभारी कुलगुरू डॉ.विनायक देशपांडे यांनी विद्यापीठाच्या प्रणालीतच समस्या आहेत, अशी कबुली दिली. विद्यापीठात आजघडीला असंख्य समस्या आहेत. या समस्यांचा तोडगा सदस्यांनी सुचवावा, यासाठी कुठल्याही ‘अजेंडा’ न ठेवता बैठक बोलविण्याची गरज आहे. प्राधिकरणांत अनेकदा समस्यांचे निवारण होत नाही, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.