शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
3
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
4
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
5
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
6
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
7
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
8
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
9
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
10
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
11
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
12
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
13
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
14
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
15
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
16
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
17
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
18
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
19
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
20
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे

‘आरएसएस’ नावाने नवीन नोंदणी का देऊ नये? हायकोर्टाची शासनाला नोटीस : उत्तर सादर करण्याचा आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2017 4:22 AM

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी राज्य शासन व इतर प्रतिवादींना नोटीस बजावून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) या नावाने नवीन संस्थेला नोंदणी का देण्यात येऊ नये, यावर उत्तर सादर करण्याचा आदेश दिला.

नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी राज्य शासन व इतर प्रतिवादींना नोटीस बजावून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) या नावाने नवीन संस्थेला नोंदणी का देण्यात येऊ नये, यावर उत्तर सादर करण्याचा आदेश दिला.यासंदर्भात नागरी हक्क संरक्षण मंचचे अध्यक्ष जनार्दन मून यांनी याचिका दाखल केली आहे. सुरुवातीला त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नावाने संस्था नोंदणीसाठी धर्मादाय कार्यालयात अर्ज दाखल केला होता. सहायक धर्मादाय आयुक्त करुणा पत्रे यांनी ४ आॅक्टोबर रोजी अर्ज खारीज केला. त्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे.याचिकेतील प्रतिवादींमध्ये राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाचे सचिव, सहायक धर्मादाय आयुक्त व मूळ अर्जावरील आक्षेपकर्ते अ‍ॅड. राजेंद्र गुंडलवार, दीपक बरडे, प्रशांत बोपर्डीकर व मोहनीश जबलपुरे यांचा समावेश आहे. याचिकेवर न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी व स्वप्ना जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. पुढील सुनावणी दिवाळीनंतर होईल.मूळ अर्ज खारीज करताना २२ डिसेंबर २००५ रोजीचे परिपत्रक विचारात घेण्यात आले होते. त्या परिपत्रकाद्वारे संस्थेच्या नावात भारतीय शब्द वापरण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे सहायक धर्मादाय आयुक्तांनी भारतीय व राष्ट्रीय शब्द सारखेच वाटत असल्याचे कारण देऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नावाने नोंदणी देण्यास नकार दिला होता. तसेच, राष्ट्रीय शब्द वगळून अर्ज दाखल करण्याची मुभा मून यांना दिली होती.मून यांच्या म्हणण्यानुसार संस्थेच्या नावात राष्ट्रीय शब्द वापरण्यास कुठेही बंदी नाही. त्यामुळे वादग्रस्त आदेश रद्द करून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नावाने संस्थेला नोंदणी देण्याची विनंती त्यांनी न्यायालयाला केली आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची संस्था नोंदणी कायद्यांतर्गत नोंदणी झालेली नाही. त्यामुळे या नावाने नवीन संस्थेची नोंदणी नाकारता येणार नाही असा दावाही मून यांनी केला आहे.

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघCourtन्यायालय